मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संजय राठोड यांच्यावरील आरोप निघाले खोटे, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या...

संजय राठोड यांच्यावरील आरोप निघाले खोटे, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या...

 'संजय राठोड यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते, ते पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला हे पोलिसांनी शोधून काढावं?

'संजय राठोड यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते, ते पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला हे पोलिसांनी शोधून काढावं?

'संजय राठोड यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते, ते पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला हे पोलिसांनी शोधून काढावं?

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 21 ऑगस्ट : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर एका महिलेनं पोलिसांना पत्र पाठवून शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार केली होती. पण, तपासाअंती हे खोटं असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी लगेच यू-टर्न घेत आपली भूमिका मांडली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यवतमाळमधील घाटंजी पोलीस ठाण्यात एका महिलेनं पत्र पाठवून शरीरसुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप केला होता. पण, तपासाअंती काहीच निष्पन्न झाले. यावर चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

'संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचं पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला शोधून काढावं यवतमाळ पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. घाटंजी परीसर हा काही मोठा नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली.

मुळात, संजय राठोड यांच्याविरोधात जे पत्र पोलिसांना पाठवण्यात आले होते, त्यामुळे ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहे, त्यांचं नाव, कुणी तक्रार केली, याची संपूर्ण माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी नेमणूक करण्याची घोषणा केली होती. पण, मध्यंतरी महिलेवर दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची शुद्धीत जबाब नोंदवला, त्या महिलेनं असं माझ्या नावाने कुणीतरी खोडसाळपणा करून पत्र पाठवले असं सांगितलं, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं.

7 वर्षांच्या माहीला वाचवण्यासाठी पाहिजे 2.5 कोटीचं इंजेक्शन; मागितली मदत

तसंच, नेमकं संजय राठोड यांच्या केसमध्ये ते निरपराध कशा पद्धतीत आहेत हे सांगायचा याआधी ही प्रयत्न झालाय व आता ही अगदी तेचं झालं आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीचं नाही, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी पूर्ण केली, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी याबद्दल माहिती दिली.

14 ऑगस्टला नमूद महिला तिचे वडील भाऊ आणि पती यांचे सोबत ती पोलीस स्टेशन घाटंजी येथे बयान देण्यासाठी विशेष चौकशी पथक का समोर उपस्थित राहिल्या. चौकशी पथकातील महिला पोलrस अधिकाऱ्यांनी सदर महिलेची मनस्थिती ठीक असल्याची खात्री केली आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या महिलेचे कॅमेरा विचारपूस करून बयान नोंदविण्यात आलेला आहे. या बयानामध्ये सदर महिलेने दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी सदर अर्ज त्यांनी स्वतः पाठविलेला नाही, सदर अर्जामध्ये त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.

नातीला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत भिडले आजी-आजोबा आणि...; अंगावर काटा आणणारी घटना

एवढंच नाहीतर, अर्जावरील सही सुद्धा त्यांची नाही, त्यांचे पतीचे नाव सुद्धा खोटे आहे. त्यांची आमदार संजय राठोड यांच्या विषयी काही तक्रार नव्हती. त्यांच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने सदरचा अर्ज केल्याचे नमूद केले आहे, असं दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितलं.

तसंच, त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सदर अर्जाशी काहीएक संबंध नाही. अर्जातील नमूद करत या विषयाच्या बाबी या संपूर्णपणे खोट्या व निराधार असल्याचे निष्पन्न झाले. तसंच,  ज्या पोस्टातून हे पंजीकृत पोस्ट पाठवण्यात आले त्याबद्दल चौकशी केलेली आहे तसंच इतर  साक्षीदार किंवा ज्यांची नावे नमूद होती, त्या सगळ्यांचे बयान दर्ज केलेले आहेत. विशेष चौकशी पथकाने संजय राठोड यांच्याविरोधातील तक्रार आणि आरोप हे संपूर्णपणे खोटे व बिनबुडाचे असल्याचं आणि त्यामध्ये काही तथ्य असल्याची बाब नमूद केलेली आहे.

First published:

Tags: भाजप