S M L

घाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक

काल दुपारच्या दरम्यान मुंबईच्या घाटकोपर परिसरात झालेल्या विमान अपघातात वैमानिक मारिया झुबेरी यांचा मृत्यू झाला.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 29, 2018 12:06 PM IST

घाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक

मुंबई, 29 जून : काल दुपारच्या दरम्यान मुंबईच्या घाटकोपर परिसरात झालेल्या विमान अपघातात वैमानिक मारिया झुबेरी यांचा मृत्यू झाला. मारिया यांच्या कुटुंबाने दावा केला आहे की, मारिया या देशातीय पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक होत्या. त्यांचे आई-वडिल इलाहबादच्या रानी मंडी परिसरात राहतात.

विमान कोसळून आपल्या मुलीचा मृत्यू झाला या बातमीनंतर मारिया यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 42 वर्षांच्या मारिया यांचा जन्म इलाहबादमध्येच झाला. मारियाचे वडिल डॉक्टर आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. या सगळ्यात ती मोठी होती.

हेही वाचा...


सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मप्लिफ्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

लहानपणापासून पायलट होण्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या मारिया यांचा विमान अपघातात असा अकाली मृत्यू झाल्याने सगळ्यांवर शोककळा पसरली आहे.

Loading...
Loading...

दरम्यान, घाटकोपर विमान दुर्घटना ही युव्हाय एव्हिएशन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा खळबळजनक आरोप या दुर्घटनेतील मृत वैमानिक मारिया यांच्या पतीनं केलाय.

मारिया यांनी हवामान खराब असल्याचं सांगत उड्डाणासाठी नकार दिला होता. मात्र त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून एव्हिशन कंपनीनं चाचणी उड्डाणाचा निर्णय घेतल्याचा आरोप मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 12:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close