Home /News /mumbai /

BREAKING : बंडखोरी भोवणार, एकनाथ शिंदेंसह सर्व बंडोबा होणार बिनकामाचे मंत्री?

BREAKING : बंडखोरी भोवणार, एकनाथ शिंदेंसह सर्व बंडोबा होणार बिनकामाचे मंत्री?

बंडखोर शिवसेना नेत्यांना पदं दिली आहे, अशा सर्व नेत्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बंडखोर शिवसेना नेत्यांना पदं दिली आहे, अशा सर्व नेत्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बंडखोर शिवसेना नेत्यांना पदं दिली आहे, अशा सर्व नेत्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 25 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. पण आता या बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं (shivsena) कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह जे जे मंत्री बंडामध्ये सामील झाले आहे, त्या सर्वांचे मंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. शिवसेनेनं आता ज्या बंडखोर शिवसेना नेत्यांना पदं दिली आहे, अशा सर्व नेत्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर जे मंत्री आहेत त्यांनाही मंत्रिपदावरून काढण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. गुलाबराव पाटील शंभूराजे देसाई, अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही यात समावेश असणार आहे. त्यामुळे शिवसेनेची दिलेली मंत्रिपदावर आता बंडखोर नेत्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याची शक्यता आहे. या नेत्यांची मंत्रिपदं जाणार कॅबिनेट मंत्री 1) एकनाथ शिंदे, नगरविकास, MSRDC मंत्री 2) दादा भूसे, कृषी मंत्री 3) गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री 4) संदीपान भूमरे, रोहीयो मंत्री राज्यमंत्री 1) शंभुराजे देसाई, गृहराज्य ( ग्रामीण ) मंत्री 2) अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री 3) बच्चू कडू,  शिक्षण राज्य मंत्री 4) राजेश क्षीरसागर राज्य नियोजन आयोग अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) दरम्यान,सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांना समन्स बजावला आहे. एवढंच नाहीतर 16 आमदारांना आज 5 वाजेपर्यंत नोटीस दिली जाणार आहे. मेलद्वारे नोटीस पाठवली जात आहे.आतापर्यंत 6 आमदारांना नोटीस पाठविण्यात आले आहे. लेखी पत्र आमदारांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. सुनील प्रभू यांनी बजावलेल्या नोटीशीला कायदेशीररित्या उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, बंड पुकारल्यानंतर पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली. सर्वात आधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीनुसार, २२ जून रोजी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले होते. पण, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात केली आणि सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीला एकनाथ शिंदे कसं उत्तर देता हे पाहण्याचे ठरणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या