मुंबई, 28 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. अनेक नेते, मंत्री यावेळी उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील अशी चर्चा केली जात होती. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांकडून असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं दिसून येत आहे.
काय घडलं कॅबिनेट बैठकीत?
यावेळी सर्व मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला. त्यांनी सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे. यापुढे मोठ्या निर्णयासाठी कॅबिनेट बैठक घेण्याची गरज नसल्याचंही यावेळी मंत्र्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीकडून फ्लोअर टेस्टपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला...
आताही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. फ्लोअर टेस्ट होईपर्यंत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असं सांगितलं जात आहे.
कॅबिनेट बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा (Phone discussion between Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi) झाल्याची मोठी बातमी समोर आली होती. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतरते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ (Indication of Uddhav Thackeray's resignation) शकतात, असंही सांगितलं जात होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.