Home /News /mumbai /

मराठा आरक्षणासाठी काही तासांत सर्वपक्षीय बैठक, देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण

मराठा आरक्षणासाठी काही तासांत सर्वपक्षीय बैठक, देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत राहणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे इतर मंत्रीही हजर राहणार आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अखेर या बैठकीसाठी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारकडून निमंत्रणाचा निरोप देण्यात आला आहे. आज संध्याकाळी मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  सायंकाळी 6.30 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात विविध पक्षांच्या नेत्यांसमवेत ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत राहणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे इतर मंत्रीही हजर राहणार आहे.  या बैठकीला  अशोक चव्हाण हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सहभागी होणार आहे. सुप्रिया सुळे पुन्हा आक्रमक, संसदेत 'या' मुद्द्यावरून मोदी सरकारला धरलं धारेवर या बैठकी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात कशी बाजू मांडणार, काय करता येईल, मराठा समाजासाठी पुढील भूमिका काय असायला पाहिजे, यासह अन्य मुद्द्यांवर चर्चा होणार असण्याची शक्यता आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यालयात कोरोनाचा उद्रेक, प्रदेशाध्यक्षांसह 17 जण पॉझिटिव्ह विशेष म्हणजे, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे.  ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती दिली. तसंच, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, NCP, Shivsena, Uddhav Thackery

    पुढील बातम्या