Home /News /mumbai /

पुन्हा सत्तास्थापनाचे वारे? 'आमदारांनो मुंबईला या...', भाजपने काढला आदेश!

पुन्हा सत्तास्थापनाचे वारे? 'आमदारांनो मुंबईला या...', भाजपने काढला आदेश!

पुन्हा देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री?

    मुंबई, 27 जून : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे (Supreme Court decisions) आतापर्यंत झालेली गुंतागुंत काही अंशी सुटल्याचं दिसत आहे. अर्थात हा निर्णय एकनाथ शिंदे गटासाठी दिलासादायक ठरला आहे. त्याहीपेक्षा सध्या भाजपमध्ये आनंदी आनंद असल्याचं दिसत आहे. आज भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यात पुढील रणनीती ठरवली जात असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) गटातील 16 आमदारांना 11 जुलैपर्यंत दिलासा मिळाल्याने आता ते राज्यपालांकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर राज्यपाल फ्लोअर टेस्ट घेऊ शकतात. यावेळी एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. शिंदे गट बहुमतात असल्याने महाविकास आघाडी सरकार पडू शकतं. यावेळी शिंदे भाजपसोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यापूर्वीही दिले आहेत. त्यामुळे भाजपने राज्यभरातील आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. फ्लोअर टेस्ट झाल्यास आमदारांची उपस्थिती अनिवार्य असते. अशावेळी आमदारांना पुढील काही दिवस महाराष्ट्राबाहेर जाऊ नये असंही सांगितलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात आनंदी आनंद पसरल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी नेते एकमेकांमध्ये मिठाई वाटत आहेत. 11 जुलैपर्यंत बंडखोर 16 नेत्यांवरील कारवाई रोखल्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला आहे. लवकरच ते सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. याशिवायशिंदेंसोबतनसलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या