Breaking News: सर्वांना धक्का देत MIM ने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी!

Breaking News: सर्वांना धक्का देत MIM ने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी!

सर्व पक्षांना धक्का देत MIMने विधानसभेच्या तीन जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जोरदार करत आहेत. युती, आघाडी कशी आणि कोणा सोबत करावी. जागा वाटपाचे सूत्र काय अशी चर्चा सुरु असताना MIM (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करुन सर्वांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे आजच पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली होती.त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांना धक्का देत विधानसभेच्या तीन जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले.

MIMने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे यांना, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्य मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात MIMने बाजी मारली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा एका पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

त्याआधी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी यांनी शिक्कामोर्तब केले. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून तो पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी MIM आणि भारिपचा काडीमोड झाला. विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावर आपण फक्त ओवेसी यांच्याशी बोलू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. 'आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैदराबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जोपर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम आहे,' असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं होतं.

जागावाटपाबद्दल MIM चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता MIM बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. MIM ने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

MIM ला 98 जागांवर निवडणूक लढवायची होती पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांच्या या पक्षाने वंचित बहुजन आघाडीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत MIM ने वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत औरंगाबादमध्ये MIM चे इम्तियाज जलील हे खासदार झाले पण MIM सोबत गेल्यामुळे मुस्लीम मतं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नाहीत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या पण जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे.

VIDEO : 'वंचित'शी काडीमोड घेतल्यानंतर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या