सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यात, आता महाराष्ट्राचं लक्ष पवारांच्या भूमिकेवर

सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यात, आता महाराष्ट्राचं लक्ष पवारांच्या भूमिकेवर

शरद पवार हे कराडहून कोकणात जाणार होते. मात्र त्यांनी तो दौरा रद्द करून ते मुंबईकडे निघाले आहेत.

  • Share this:

मुंबई 7 नोव्हेंबर : राज्याच्या विधानसभेची मुदत संपायला आता फक्त एक दिवसच राहिलाय. 8 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता फक्त काही तास राहिले असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यात आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपला कोकण दौरा रद्द करून मुंबईकडे निघाले आहेत. मुंबईत आज दिवसभर मोठ्या राजकीय हालचाली झाल्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली तर भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजप आणि शिवसेना आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता शरद पवारांकडे लागलं आहे.

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देणार असाल तरच फोन करा, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येत सरकार बनवावं असं शरद पवार वारंवार सांगत आहेत. त्याच बरोबर राजकारणात काहीही घडण्याची शक्यता असते असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यामुळे पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कराडमध्ये रेठरे बुद्रुक इथं यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि काँग्रेसे नेते पृथ्विराज चव्हाणही उपस्थित होते. शरद पवार हे कराडहून कोकणात जाणार होते. मात्र त्यांनी तो दौरा रद्द करून ते मुंबईला येणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांना परिस्थितीची माहिती दिली. महायुतीचचं सरकार यावं अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालाशी भेटून आल्यावर व्यक्त केली.

थरार...संशयी नवऱ्याने केली पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या

राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेवर आता संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. काहीही झालं तरी आता शिवसेना मागे हटणार नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर यावेळी राऊतांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीकाही केली आहे. दरम्यान, शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेचेही मुख्यमंत्री असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊतांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम, मातोश्रीवर बैठकीतल्या 10 मोठ्या गोष्टी

आता भाजपचे खेळ चालणार नाहीत. शिवसेना कधीही खोटं बोलत नाही त्यामुळे जे ठरलं आहे तेच होणार अशी शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, जर भाजपकडे बहुमत असेल तर सिद्ध करावं आणि नसेल तर ते समोर येऊन मान्य करावं असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 04:38 PM IST

ताज्या बातम्या