आलिया भट्टनं कासवाला समुद्रात सोडून दिलं जीवदान

आलिया भट्टनं कासवाला समुद्रात सोडून दिलं जीवदान

संवर्धन केंद्रात असलेल्या 50 ते 60 वर्षीय 90 किलो वजनी कासवाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि आलिया भट्टने डहाणू बीचवरील समुद्रात सोडलं.

  • Share this:

14 मे : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने डहाणू उपवनसंरक्षण विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन कासव संवर्धन केंद्रातील वेगवेगळ्या कासवांची माहिती जाणून घेतली. या केंद्रात किनारपट्टी लगत जखमी अवस्थेत सापडलेली कासवं, जमिनीवरील कासव आणि तस्करी करताना पकडण्यात आलेल्या कासवांचं जतन आणि संवर्धन केलं जातं. या केंद्राला भेट देऊन आलियाने साप आणि कासवांबाबत माहिती जाणून घेतली.

यानंतर या संवर्धन केंद्रात असलेल्या 50 ते 60 वर्षीय 90 किलो वजनी कासवाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि आलिया भट्टने डहाणू बीचवरील समुद्रात सोडलं. जीवदान मिळालेल्या कासवाला पुन्हा समुद्रात सोडताना आलिया आणि प्राणी मित्रांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पहायला मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2017 07:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading