लॉकडाउनमध्ये अडकलेल्या बळीराजाला चिंतेत टाकणारी बातमी, हवामान विभागाने दिला इशारा

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या बळीराजाला चिंतेत टाकणारी बातमी, हवामान विभागाने दिला इशारा

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले असून मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. एकीकडे महाराष्ट्र कोरोना व्हायरसशी लढा देत आहे तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे बळीराजा हवालदील झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाने इशारा दिल्यामुळे चिंतेचे ढग निर्माण झाले आहे.

मुंबईतील कुलाबा वेधशाळेनं दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रात काही भागात गारांसह पाऊस हजेरी लावणार आहे.

हेही वाचा - ...तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 4 कोटी 20 लाख डॉलरच्या हॉटेलमध्ये होणार क्वारंटाइन

तसंच 16 ते 20 एप्रिल कालवधीत राज्यातील काही भागांमध्य वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागात गारा पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रासह 19 आणि 20 एप्रिलला कोकणात ही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आधीच लॉकडाउनमुळे शेतातील पिकं मजुरांअभावी काढता आले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकं नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. तर त्यातच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे हाती आलेलं पिकंही वाया जाण्याची भीती आहे.

मान्सूनही सरासरीच्या 100 टक्के

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षात मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या 100 टक्के असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे 5 किंवा -5% कमी जास्त असेल,  असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 2 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, चिंता वाढली

मान्सून कधी येईल? काय आहे हवामान खात्याचा अंदाज

दरवर्षी मान्सून पहिल्यांदा केरळमध्ये येतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात. यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे 1 जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून 4 जून पंजाब 7 जून, हैदराबाद 8 जून, पुणे 10 आणि मुंबई 11 जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत 27 जूनला पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदलांमुळे यावेळी मान्सून दहा दिवस उशीरा निघेल असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

First published: April 16, 2020, 5:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading