Home /News /mumbai /

मुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट

मुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट

आज दिवसभर मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. येत्या 21 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाचा सामना करावा लागणार आहे.

    मुंबई, 17 जून : आज दिवसभर मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. येत्या 21 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन तास मुंबईसह ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमधील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून यापैकी काही भागात 160 ते 180 मिमीपर्यंत पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन तास नागरिकांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. हे ही वाचा-उद्यादेखील पुण्यात पावसाचं धुमशान; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून इशारा हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यंदा राज्यात मॉन्सूनचं (Monsoon in Maharashtra) आगमन अपेक्षेपेक्षा अधिक लवकर झालंय. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.  मुंबईमध्ये (Monsoon update Mumbai) गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस येतोय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय. तसंच मॉन्सूननं (Monsoon Update Maharashtra) संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही पाऊस बरसत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Rain, Thane

    पुढील बातम्या