#AlcoholKiKasam : मद्यपान करून गाडी चालवताय, हा व्हिडिओ एकदा पाहाच

नेटवर्क 18 आणि डीआयएईओओ च्या पुढाकाराने ‘रोड टू सेफ्टी’ या अभियानांतर्गत अलीकडेच 'अल्कोहोल की कसम' या संकल्पनेवर एक फिल्म लॉन्च केली आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 08:04 PM IST

#AlcoholKiKasam : मद्यपान करून गाडी चालवताय, हा व्हिडिओ एकदा पाहाच

मुंबई, 14 जून : आपल्यासाठी व रस्त्यावरच्या दुसऱ्या बाइक चालवणाऱ्यासाठी सुखरूप आणि सुरक्षित ड्रायव्हिंग आवश्यक आहे. मद्यपान करून ड्रायव्हिंग स्वत:साठी एक संकट आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एक किंवा दोन पेग घ्याल तेव्हा फक्त एक काम करा, आपल्या गाडीच्या किल्ल्या बाजूला ठेवा आणि एक कॉल करून कॅब बोलवा.

नेटवर्क 18 आणि डीआयएईओओ च्या पुढाकाराने ‘रोड टू सेफ्टी’ या अभियानांतर्गत अलीकडेच 'अल्कोहोल की कसम' या संकल्पनेवर एक फिल्म लॉन्च केली आहे, जिथे तुम्ही दारू पिऊन वाहन न चालवण्याचे वचन घेत आहात. फिल्म ड्रिंक आणि ड्रायव्हिंग न करण्यावर लक्ष केंद्रित करते. ज्यामध्ये रघु राम नावाची एक विश्वसनीय व्यक्ती दाखवली आहे, ज्यावर कोणाही पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. व्हिडिओ मध्ये तुमच्या विश्वसनिय व्यक्तिशी चर्चा करताना तुम्हाला तुमच्या आयुष्यतील सर्व चढ-उतार अनुभवायला मिळतील. रघु रामने आपल्या उत्कृष्ट संवादा मुळे चांगली छाप पाडली आहे. यात ज्याप्रकारे त्याने काम केले आहे त्यामुळे प्रेक्षक दृश्यात गुंतून राहतात, यामुळे ह्या व्हिडिओला अपवाद नाही. ज्या उत्कृष्ट पद्धतीने त्याने स्वगत केले आहे ते खूप प्रभावी आहे.


ह्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मद्यपान करताना क्षणांची मजा घेत असतो, पण प्रश्न हा आहे की ड्रिंक एंड ड्राइव खरंच योग्य आहे का? मद्यपान करून गाडी चालवून जीव धोक्यात घालणं का योग्य नाही हे हा व्हिडिओ दाखवून देतो आणि हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः हा व्हिडिओ पाहात नाही तोपर्यंत तुम्हाला अल्कोहोलकिकसम ह्या हॅशटॅग ची चीड येईल. शिवाय व्हिडिओ विनम्रपणे जो संदेश देतो, तो समजण्यासाठी सोपा आहे. या व्हिडिओचा उद्देश सुरक्षितपणे गाडी चालवण्याचा संदेश देणे एवढाच आहे. पण, ड्रिंक आणि ड्रायव्ह हे एकत्र का करता येत नाही हे समजून घेण्यासारखे आहे. यात स्वतःच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि नंतर रस्त्यावर इतरांच्या सुरक्षेसाठी यात तरतूद केली गेली आहे.

हे लक्षात घेऊन, डीआयएईओओ च्या पुढाकाराने ‘रोड टू सेफ्टी’ या अभियानांतर्गत प्रभावी संदेश दिला आहे आणि ही टिम समाजात बदल आणण्यास सक्षम असेल. तर मित्रांनो आपण कशाची वाट पाहत आहात. अल्कोहलकिकसम हा व्हिडिओ पाहा आणि रघु रामच्या उल्लसित आणि व्यंग्यपूर्ण अभिनयाचे साक्षी व्हा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...