अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं? मुंबईतले दर पाहाल तर...

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं? मुंबईतले दर पाहाल तर...

साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सर्वांचा कल असतो. परंतु, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्व बाजारपेठा बंद आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सर्वांचा कल असतो. परंतु, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्व बाजारपेठा बंद आहे. बाजारपेठा बंद असल्या तरी आज मुंबईत सोन्याचा भाव हा 24 कॅरेटला तब्बल 48 हजार 30 रूपये प्रति तोळा जीएसटी धरून दर आहे.

अक्षय्य तृतीया दिवशी सोने खरेदी करतात. यंदा मात्र, लॉकडाउन असल्याने मुंबईत सराफ मार्केट बंद आहे. सोने खरेदी करता यावे यासाठी ऑनलाइन  सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण असं असलं तरी सोन्याचे दर तब्बल 48 हजारात असल्याने किती प्रतिसाद मिळेल, या विषयी शंका आहे.

मुंबईत साधारणपणे दररोज दोनशे कोटी व्यवहार सराफा बाजार होतो. मात्र, मागील 1 महिना लॉकडाउनमुळे सराफा बाजार बंद आहे. त्याचा फटका ग्राहकांनी सराफ व्यापाऱ्यांना बसला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बातमी, पोलिसाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर!

अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मागील वर्षी सोन्याचा दर हा 37,250 रूपये दर होता.  त्यातच अक्षय्य तृतीयाला रविवाराच दिवस चालून आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली होती.  तेव्हा 300 कोटी आसपास उलाढाल मुंबईत झाली होती. यंदा मार्केट बंद असल्याने सराफा उद्योग फटका बसेल पण त्याचवेळी ऑनलाइन सोने खरेदी सुविधा ठेवली आहे, अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष  जैन यांनी दिली.

दरम्यान, लॉकडाउनमुळे दुकाने बंद आणि त्यामुळं दुकानात जाऊन सोने खरेदी शक्य नाही. त्याच बरोबर रविवार आल्याने शेअर मार्केट आणि बँका बंद त्यामुळे सोन्यात आणि शेअर बाजारात गुंतवणूक हे पर्यायही कुचकामी ठरले आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! डायलेसीसच्या उपचारासाठी गेले आणि रुग्णालयात झाला कोरोना, गमावले प्राण

थोडक्यात पहिल्यांदाच अक्षय्य तृतीया आणि सोने खरेदी हे समीकरण तुटणार आहे. अर्थात लॉकडाउन संपलं की, सोने खरेदी करता येईल असं जाणकार सांगत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: April 26, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या