• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'अजितदादा, तु्म्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचंय', बहिणीने व्यक्त केली इच्छा

'अजितदादा, तु्म्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचंय', बहिणीने व्यक्त केली इच्छा

'अजितदादा आमच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप कामं केली आहे आणि आजही ते करत आहे'

 • Share this:
    मुंबई, 03 ऑगस्ट : भाऊ आणि बहिणीच्या नात्याची वीण घट्ट बांधण्याचा सण. आज प्रत्येक बहिणी आपल्या भावाकडे काहींना काही मागत असते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीचे हट्ट पुरे करत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांनी आपल्या भावाकडे खास अशी मागणी केली आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,  रक्षाबंधनाच्या निमित्त डॉ. रजनी इंदुलकर यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावी, त्यांना एकदिवस पंतप्रधान म्हणून बघायची इच्छा आहे. आमची ही अपेक्षा एक दिवस पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर, 'अजितदादा आमच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप कामं केली आहे आणि आजही ते करत आहे. त्यांचा प्रवास हा खूप मोठा आहे. एकदिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजिदादांना पाहायचं आहे' अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. अजितदादांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे.  बहीण म्हणून अजित पवार यांनी आपले काही दु:ख असेल तर हलके करण्याची आम्हाला संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  निवासस्थानी कुटुंबासोबत  रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. दरवर्षी प्रमाणे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना राखी बांधली. यावेळी कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे अजितदादा  हातातील ग्लोजसह घरी दाखल झाले होते. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना ओवाळून राखी बांधली. राखी बांधल्यानंतर अजितदादांनी आपल्या या बहिणीचे आशिर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. यावेळी घरी त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि इतर सदस्यही हजर होते.
  Published by:sachin Salve
  First published: