Home /News /mumbai /

फडणवीस आणि राज ठाकरे भेटीवर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

फडणवीस आणि राज ठाकरे भेटीवर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने मनसे एकटी पडली होती. तर भाजपलाही नव्या सवंगड्याची गरज होती यातून भाजप आणि राज ठाकरे जवळ येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

  मुंबई 08 जानेवारी : येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समिकरणांची जुळवणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भेटल्याने राजकारणात खळबळ उडालीय. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नजऱ्या या भेटीतून काय निघते याकडे लागल्या आहेत. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने मनसे एकटी पडली होती. तर भाजपलाही नव्या सवंगड्याची गरज होती यातून भाजप आणि राज ठाकरे जवळ येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्या पार्श्वभूमीवर या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येत सरकार बनवलं होतं. मात्र ते फक्त 80 तासच टिकलं त्यामुळे अजित पवार काय बोलतात याकडे लक्ष लागलं होतं. अजित पवार म्हणाले, ज्या ठिकाणी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्याच ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो. पण त्या दोघांच्या भेटीत नेमकं काय झालं ते माहित नाही असंही त्यांनी सांगितलं. अशी झाली होती राज-फडणवीस भेट गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आलीय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातेय. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरविणार आहेत. गेली काही वर्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांनी जाहीर सभांमधून व्हिडीओ दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. पुणेकरांनो सावधान, नव्या 'सायबर' गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे शहर आता महाराष्ट्रातली परिस्थिती बदलल्याने राज ठाकरे  वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने मनसेची कोंडी झाली होती. कारण मनसेने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देणारी भूमिका घेतली होती. विधानसभेत सध्या मनसेचा एक आमदार आहे. या बदलत्या राजकारणाचा भाग म्हणून मनसे आपला झेंडाही बदलविणार असून हिंदुत्वाची कास धरण्याची शक्यता आहे.

  Osmanabad ZP Election : शिवसेनेच्या सावंताची पक्षविरोधी भूमिका, भाजपशी घरोबा

  मनसेचा झेंडा बदलणार येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Ajit pawar, Raj Thackeray

  पुढील बातम्या