मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र, केली महत्त्वाची मागणी

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र, केली महत्त्वाची मागणी

 पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 ऑगस्ट : बेळगावच्या (belgaum city) मुद्यावर राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  (ajit pawar) आक्रमक झाले आहे.  बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह शकडो मराठी गावं महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना पत्र लिहिले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून बेळगावाबद्दल आठवण करून दिली आहे.

'बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकीसह संयुक्त महाराष्ट्र साकारण्यास सीमा भागतील बांधव मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत आहेत. त्यांच्या सोबतच अजित पवार यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीमा भागातील शेकडो मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात विलिन करावीत अशी मागणी केली आहे. सध्या गेली कित्येक वर्षे सीमा भागातील मराठी गावांचा प्रश्नं न्यायप्रविष्ठ आहे.

बेळगाव,कारवार,बिदर,भालकी,निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषक गावांचा महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 60 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. लाखो मराठी भाषक बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

नीरज चोप्राची ‘फॅट-टू-फिट’ जर्नी तुम्हालाही करेल इन्सपायर

सीमा भागातील मराठी भाषक बांधवांच्या न्याय्य मागणीला पाठिंबा दर्शवत पंतप्रधान महोदयांना पत्र लिहून महाराष्ट्र व सीमा भागातील मराठी बांधवांशी न्याय करण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

First published:

Tags: Ajit pawar, PM narendra modi