Home /News /mumbai /

2004 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री झाले असते पण...; फडणवीसांनी दाबली दुखरी नस

2004 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री झाले असते पण...; फडणवीसांनी दाबली दुखरी नस

देवेंद्र फडणवीसांना पोलिसांची नोटीस, अजित पवारांनी सल्ला देत केलं मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीसांना पोलिसांची नोटीस, अजित पवारांनी सल्ला देत केलं मोठं वक्तव्य

अजित पवारांकडे विरोधी पक्ष नेते पद देण्यात आलं आहे.

    मुंबई, 4 जुलै : आज बहुमत चाचणीत शिंदे-भाजप 164 मतांनी विजयी झाले. यावेळी मविआला 99 मतं मिळाली. यावेळी विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांची घोषणा करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं (Ajit Pawar) अभिनंदन केलं. यावेळी दोघांनीही अजित पवारांचं कौतुक केलं. अजित पवारांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, दादांनी आतापर्यंत चारवेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. 2004 मध्ये खरं तर अजित दादा मुख्यमंत्री झाले असते. पण तसं होऊ शकले नाही. (2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रिपद काँग्रेसच्या विलासराव देशमुखांना देण्यात आलं होतं ) 2004 मध्ये नेमकं काय घडलं होतं... 2004 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये मतभेद झाले होतं. 2004 च्या निवडणुकीत युती पक्षांमध्ये 2019 प्रमाणेच पेच निर्माण झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून 140 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेना-भाजपला केवळ 126 जागा मिळाल्या. यावेळी अपक्ष आमदारही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत होते. मात्र मुख्यमंत्रिपदावरून पेच अडकला. राष्ट्रवादीला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. सर्वात मोठ्या पक्षालाच मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याने दोघांमध्ये युती झाली. त्यानंतर तब्बल 16 दिवस काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त काँग्रेसने राष्ट्रवादीला तीन अतिरिक्त कॅबिनेट पदेही देऊ केली होती. राज्यात 13 दिवस विधानसभाच राहिली. तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फझल यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतभेद मिटवायला सांगितले. अखेर या निकालानंतर १६ दिवसांनी विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीला तीन कॅबिनेट पदे देण्यात आली. अजित पवारांबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री -अजितदादांनी चारवेळा उपमुख्यमंत्रिपद भूषणवलं. -महाराष्ट्रातील सर्वमान्य नेतृत्व म्हणून दादांकडे पाहिलं जातं. -तरुणांंमध्ये अजित पवारांची क्रेझ पाहायला ंमिळते. -दादांचा रोखठोकपणा आम्हाला आवडतो. -अजित पवारांमुळे मंत्रालय उघडावं लागत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जबरदस्त भाषण... आतापर्यंत शांत दिसणाऱ्या एकनाथ शिंदेंनी विधानसभेत फटकाऱ्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अत्यंत खुलेपणाने सुरतच्या प्लान विषयी बोलले. आम्ही कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणलं नाही. सर्वजणं आपल्या मनाने आले आहेत. नितीन देशमुखला मी मुंबईला पाठवलं. मी त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. सुरुवातीला मी गेलो तेव्हा 29 जणं होतं. त्यानंतर आणखी 15 ते 20 जणं वाढले. सुरतेच्या प्लानबद्दल बोलताना ते म्हणाले...आम्ही राज्याच्या सीमेच्या बाहेर होतो. त्यावेळी टॉवर लोकशन होते. आयजीला सांगून नाकाबंदी केली. मीही बरीच वर्ष काम केली. मलाही माहिती आहे, कसं निघायचं आहे ते. त्यावेळी अजितदादांनी विचारलं सगळं काही सांगा...पण तुम्ही आता माझ्याकडून सगळं काही काढून घेऊ नका, खासगीमध्ये सांगतो सगळं, मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हीही निघून जायचे. आतापर्यंतच्या भाषणात त्यांनी अनेक गुपितं उघड केली होती. त्यानंतर ते पुढील टप्प्याबद्दल बोलणार इतक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हटकलं, आणि सर्व सांगू नका असंही म्हणाले. आणि स्वत: हसू लागले. हे पाहून अख्खाय विधानसभेत हश्या पिकला. आपल्या अनोख्या शैलीत एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही आपलसं केलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde, NCP

    पुढील बातम्या