अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च, सरकारकडून मंजुरी

अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च, सरकारकडून मंजुरी

वित्त विभागाने या साठी वार्षिक 5 कोटी 98 लाख रुपयांची तजवीज देखील केल्याबाबत शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सोशल मीडियाकडे (Social media) मोर्चा वळवला आहे. यासाठीच अजित पवार यांच्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (Directorate General of Information and Public Relations) स्तरावरील समाज माध्यमांचा कामासाठी बाहेर संस्थेची निवड करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, युट्युब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमातून चांगली प्रतिमा तयार होण्यासाठी वर्षाला तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे.

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही स्वतःची समाज माध्यमांवर प्रतिमा गुंतवण्यासाठी शासकीय कोट्यातून करोडो रुपये खर्च करणार आहे.

EPFO ने वाढवला डेथ इन्श्यूरन्स क्लेम, एकही पैसा न गुंतवता मिळेल एवढी रक्कम

अजित पवार यांच्या इमेज बिल्टअपसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये सोशल मीडियावर उपयोग अधिक प्रमाणात करण्यासाठी लागणारे तांत्रिक व्यावसायिक कौशल्य नसल्याची बाब कारण देत बाह्य संस्थांकडून अधिक प्रभावीपणे काम व्हावे यासाठी राज्य शासनाच्या लोकाभिमुख निर्णय उपक्रम शासकीय योजना धोरण आधीची माहिती जनसंपर्क जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क साधता यावा यासाठी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ब्लॉग, वेबसाईट आदी समाज माध्यमातील प्लॅटफॉर्मवर योग्य इमेज उंचावण्याचे काम अजित पवार यांचं करण्यात येणार आहे.

यासाठी फोटो, व्हिडीओज याचा देखील वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी निविदा पद्धतीचा अवलंब करून माहिती व जनसंपर्क विभागाने बाह्य संस्थेची निवड करावी समाज माध्यमातून द्यावयाच्या प्रसिद्धीच्या याच्या मधील त्रुटी राहणार नाहीत तसंच संबंधित कामकाजावर आवश्यक ते नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील महासंचालनालयाकडे राहील.

शेतकऱ्यांसाठी Good News! वार्षिक 6000 च नाही तर मिळतील दरमहा 3000, वाचा सविस्तर

वित्त विभागाने या साठी वार्षिक 5 कोटी 98 लाख रुपयांची तजवीज देखील केल्याबाबत शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे. या पूर्वी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दोन हात दूर राहिले आहेत. आता सध्याच्या काळात समाज माध्यमांमध्ये अजित पवार हे देखील इतरांप्रमाणेच इमेज सुधारण्याचे काम करू पाहात आहेत, अर्थात शासकीय खर्चातून हे काम केले जाणार असल्याने यावर विरोधक टीका देखील सुरू करत आहेत.

Published by: sachin Salve
First published: May 13, 2021, 10:10 AM IST

ताज्या बातम्या