Home /News /mumbai /

'...तर मीच तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या जागी बसवलं असतं'; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

'...तर मीच तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या जागी बसवलं असतं'; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

यावेळी बोलताना 'एकनाथजी तुम्ही मला कानात जरा सांगितलं असतं की, उद्धवजींना सांगा अडीच वर्ष झाले. तर मीच तुम्हाला मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं', असं अजित पवार म्हणाले.

    मुंबई 03 जुलै : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. त्यानंतर सभागृहामध्ये बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मात्र यासोबतच त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) कडाडून टिकाही केली. यावेळी बोलताना 'एकनाथजी तुम्ही मला कानात जरा सांगितलं असतं की, उद्धवजींना सांगा अडीच वर्ष झाले. तर मीच तुम्हाला मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं', असं अजित पवार म्हणाले. पुढे अजित पवार म्हणाले, राहुल नार्वेकर आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते. त्यांच्या बरोबर काम केलं होतं. त्यांचं मनापासून कौतुक आहे. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या अतिशय जवळ जातात. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंना आपलं केलं. आमच्याकडे आले आणि मला आपलंसं केलं. भाजपमध्ये फडणवीस यांना आपलंसं केलं. आता शिंदेसाहेब तुम्ही त्यांना आपलंसं करून घ्या, नाही तर काही खरं नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. Assembly Speaker Election : होय, शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं, एकनाथ शिंदे सभागृहात गरजले पुढे अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे टीव्हीवर बोलत होते. आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील. असं ऐकताच एकच शांतता पसरली आणि भाजपचे नेते खळखळा रडायला लागले. कुणाला काही कळेना, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. कुणालाच काही कळेना. गिरीश महाजन यांचं अजून रडणं थांबेना. ते अजूनही बांधलेला फेटा काढताय आणि डोळे पुसत आहे. खऱ्या अर्थाने इतकं वाईट वाटत आहे की आता काही करू शकत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. मी जेव्हा या सभागृहामध्ये पाहतो, त्यावेळी मुळच्या भाजपच्या मान्यवरांची संख्या कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त पाहायला आहे. तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचं वाईट वाटतं, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ajit pawar, Eknath Shinde

    पुढील बातम्या