Home /News /mumbai /

भाजप-राष्ट्रवादी युतीच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "मग इतकी वर्षे कशाला..."

भाजप-राष्ट्रवादी युतीच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "मग इतकी वर्षे कशाला..."

भाजप-राष्ट्रवादी युतीच्या विधानावर अजित पवारांचा आशिष शेलारांना रोखठोक सवाल

भाजप-राष्ट्रवादी युतीच्या विधानावर अजित पवारांचा आशिष शेलारांना रोखठोक सवाल

Ajit Pawar reaction on BJP-NCP Yuti: 2017 साली भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापनेच्या संदर्भात ठरलं होतं असं वक्तव्य भाजप नेत्याने केल्यावर त्यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 28 एप्रिल : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यात सत्ता स्थापनेबाबत 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर जागावाटप आणि खातेवाटपाच्या संदर्भातही चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपला रोखठोक सवाल केला आहे. (Ajit Pawar reaction on BJP-NCP alliance news) अजित पवार म्हणाले, 2017 सालीच सांगायचं होतं ना? मग इतके दिवसस, 5 वर्षे कशाला थांबलात? मला एक कळत नाही की, आता आपण 2022 मध्ये आहोत आणि 2017 मध्ये असं असं... आता मग 2017 मध्ये आत्ताचे बरेच नेते इकडे तिकडे होते. त्यांची त्यावेळी वक्तव्ये वेगळी होती आणि आता वेगळे आहेत. मागच्या गोष्टी काढून काय उपयोग. महाराष्ट्रातील प्रश्न काय महत्त्वाचे आहेत ते आधी पाहूयात. 2017 ला तसं झालं... 2012 ला तसं झालं...2010 ला तसं झालं... यामध्ये कुणाला रस नाहीये. आज काय आहे... आजप आपल्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत याबाबत चर्चा झाली पाहिजे. वाचा : 'करारा जवाब मिलेंगा' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेची तारीख ठरली, चौफेर तोफ धडाडणार! मनसेला राष्ट्रवादीची फूस? अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेला फूस असती तर पवार साहेबांना राज ठाकरेंनी जातीयवादी म्हटलं असतं का? हे साधं गणित आहे आणि सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तरी तो उत्तर देईल. राज ठाकरे भाषण करताना भाजपवर टीका करत नाहीयेत तर केवळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. आज राज ठाकरेंचा तोच अजेंडा दिसत आहे. लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यांनी भाजपलाच टार्गेट केलं होतं. त्यावेळी आघाडीच्या उमेदवारांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन करणाऱ्या सभा ते घेत होते. "2017मध्येच BJP-NCPच ठरलेलं, खातेवाटप चर्चाही झाली पण.." भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं (BJP-NCP alliance) सरकार स्थापनेच्या संदर्भात 2017 मध्येच ठरलं होतं असा गौप्यस्फोट आशिष शेलारांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटप आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर खातेवाटपाच्या संदर्बातही चर्चा झाली होती. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार असण्याच्या संदर्भात चर्चा झाली. शिवसेनेला दूर न करण्याचा सल्ला भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी दिला होता. पण शिवसेना सोबत असताना युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आणि त्यामुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झालं नाही असं आशिष शेलार म्हणाले. दैनिक लोकसत्ताने आयोजित केलेल्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ajit pawar, Ashish shelar, BJP, Maharashtra politics, NCP

    पुढील बातम्या