Home /News /mumbai /

'...तर विरोधी पक्षाचे 18 आमदार निलंबित झाले असते' : अजित पवार

'...तर विरोधी पक्षाचे 18 आमदार निलंबित झाले असते' : अजित पवार

Ajit Pawar on opposition party mla suspension: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच भाजप आमदारांनी गोंधळ घातला. यानंतर 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 6 जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशीच भाजप आमदारांनी (BJP MLA) जोरदार गोंधळ घातला. इतकेच नाही तर आपल्याला शिवीगाळ केल्याचंही विधानसभेचे तालिका सभापती भास्कर जाधव यांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन (12 mla suspension) करण्यात आले. विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पूर्ण झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदारांच्या निलंबनावर भाष्य केलं आहे. ... तर 18 आमदार निलंबित झाले असते आमदारांच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, 12 आमदारांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे 12 निलंबित केले, जर 18 आमदारांनी गोंधळ घातला असता 18 आमदारांना निलंबित केले असते. विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे मात्र, त्या 12 आमदारांचा आणि विरोधी पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा काहीही संबंध नाहीये हा निव्वळ योगायोग आहे. ...मग मिरच्या का झोंबल्या? मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल गेली अनेक वर्षे सभागृहात काम करत आहे. या सभागृहात पवित्र राखलं गेल पाहिजे. काल झालेली घटना अशोभनीय आहे. विरोधी पक्षाचा तोल गेला. अध्यक्षांच्या दालनात झालेला गोंधळ शरमेने मान खाली घालणारा होता. लोकशाहीत विरोध करण्याची एक प्रमापरा पायदळी तुडवला. विधिमंडळात काल जे काही झालं ते चुकीचं असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांनी पुढे म्हटलं, आजही विरोधकांनी प्रति विधानसभा त्यांनी घेतली. आजवर अशी नव्हती झाली, भाषण झाली. आजवर असं झालं नव्हतं. अध्यक्षांच्या मान्यतेशीवाय इथे काही होत नाही, पण माईक वापरून आणि असं करून त्यांचा अवमान विरोधकांनी केला. निलंबन कित्येक वेळा झालेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने संसद आणि विधानसभेत बेलगाम वागणाऱ्या सदस्यांवर लगाम लागायला हवा असं कोर्ट म्हणत. कायदे मंडळ आहे, कायदे तिथे तयार होतात, तिथे असं वागणं अशोभनीय होतं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ajit pawar, BJP

    पुढील बातम्या