• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • उद्या पत्रकार परिषद घेऊन अजित पवार करणार मोठा गौप्यस्फोट?

उद्या पत्रकार परिषद घेऊन अजित पवार करणार मोठा गौप्यस्फोट?

उद्या पत्रकार परिषद घेऊन अजित पवार करणार मोठा गौप्यस्फोट?

उद्या पत्रकार परिषद घेऊन अजित पवार करणार मोठा गौप्यस्फोट?

Ajit Pawar on Sugar factories: जरंडेश्वर कारखान्यावरुन होणाऱ्या टीकेनंतर अजित पवारांचा विरोधकांना इशारा, उद्या पत्रकार परिषद घेऊन कोणते कारखाने कुणी किती किमतीला विकत घेतले करणार जाहीर.

  • Share this:
मुंबई, 21 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन (Jarandeshwar Sugar Factory) होत असलेल्या टीकेनतंर अजित पवारांनी भाष्य करताना विरोधकांना एक सूचक इशारा दिला आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन कुठला साखर कारखाना कुणाच्या कारकिर्दीत आणि किती रुपयांना विकला गेला याची सविस्तर माहिती देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या कुटुंबीयांची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात आल्याची खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात काय फक्त जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना एकटाच विकला गेला नाहीये, माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. परंतु मला त्याच्याबद्दल नीट पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यायची आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी कदाचित इथे किंवा उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेईल. त्या संदर्भात महाराष्ट्रात सुरुवातीपासून किती कारखाने विकले गेले, कुणा-कुणाच्या कारकिर्दीत विकले गेले. काय किमतीला विकले गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही-काही कारखाने तीन कोटी, साडे तीन कोटी, चार कोटी, पाच कोटी, काही 12 कोटी, 15 कोटी तर काही 18 कोटी अशा प्रकारे विकले गेले आहेत. काही लोक जाणीवपूर्वक त्याच त्याच वस्तू आणतात आणि मीडिया पण त्याच त्याच गोष्टी दाखवतात. माझ्याविरुद्ध गरळ ओकली गेली की, मी बेईमान आहे. उभा महाराष्ट्र मला ओळखतो. मी माझ्या आयुष्यात कधीही बेईमानी केली नाही. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने घेतले आहेत. पण त्यांच्याबद्दल बोललं जातं नाही, पण माझ्या नातेवाईकांबद्दल बोललं जातं असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी केली. यासोबत अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी आणि कोल्हापूर येथील बहिणीच्या कार्यालयावर छापेमारी केली. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवारांनी म्हटलं होतं, ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये.
Published by:Sunil Desale
First published: