अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात, गूढ वाढलं

राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 07:02 PM IST

अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात, गूढ वाढलं

मुंबई 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिलाय. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. अजित पवार यांनी ई मेलवरून बागडेंना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

SPECIAL REPORT : शरद पवारांना ईडीची 'शिडी' फायद्याची ठरणार का?

ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे दिसले नाहीत. ते निर्णय प्रक्रियेपासून दूर होते. पक्षातल्या काही घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चाही आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात अस सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होत. पवार कुटुंबीयांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मतभेद होते अशीही चर्चा आहे. पार्थ पवार याच्या उमेदवारी आणि पराभवातून सुनेत्रा पवार ही होत्या नाराज होत्या असं बोललं जातं. राणा जगजितसिंह यांचा भाजप प्रवेश सुनेत्रा आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच झाल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेस उमेदवारांची पाहिली यादी झाली लीक, हे दिग्गज उतरणार आखाड्यात!

अजित पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला असून त्याबाबत पक्षातल्या कुणालाच माहिती नव्हती असंही बोललं जातंय. अजित पवारांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राजीनाम्याचं खरं कारण हे राजकीय असलं पाहिजे असंही म्हटलं आहे.

Loading...

या आधीही काही वेळा अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत निर्णय घेतले होतो. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पक्षाची बदनामी झाली होती. त्यातच अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या राजकारणामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागतोय असं सांगत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...