Home /News /mumbai /

UPA च्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा, काय म्हणाले अजित पवार

UPA च्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा, काय म्हणाले अजित पवार

शरद पवार साहेब दिल्लीत गेले की, अशा बातम्या येतातच असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबई, 10 डिसेंबर: काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  ( NCP Chief Sharad Pawar) यांची वर्णी लागू शकते. येत्या काळात शरद पवार यांच्याकडे यूपीएचे (UPA)अध्यक्ष होऊ शकतात, अशी देखील शक्यता आहे. तर सोनिया गांधी (Soniya Gandhi) येत्या काळात सेवानिवृत्त होणार असून त्या पदाची सूत्र शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार साहेब दिल्लीत गेले की, अशा बातम्या येतातच असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा...शरद पवारांनी PM पदाचं उमेदवार व्हावं, काँग्रेसनं आतापासून सुरू केली तयारी अजित पवार म्हणाले, साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे अनेक नेत्यांशी संबंध आले होते. ते सत्तेत असतानाही आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. विकास कामाच्या संदर्भात राजकारण न आणता, देशाचे महत्त्वाचे प्रश्न सुटावेत, असा शरद पवार यांचा कायम आग्रह धरला आहे. आता दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन जास्त चिघळू नये, यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मात्र, त्यांना काँग्रेसनं काय सांगितलं, हे अजूत तरी माझ्या कानावर आलं नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. एनडीएच्या विरोधात यूपीएतील घटक पक्ष कायम चर्चा करत असतात, रणनीती ठरवत असता. मात्र, याबाबत अद्याप तरी माझ्या कामावर आलं नाही, 12 डिसेंबरला शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. तो शांततेत साजरा करण्याचा आमचा प्रयन्त आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. त्यानिमित्ताने आम्ही शिबिर घेत आहोत, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. UPAच्या अध्यक्षपदी पवारांच्या नावाची चर्चा... काँग्रेस आणि UPAचं नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावं यावर गेल्या अनेक दिवसांमध्ये धुसफूस सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोनिया गांधी यांच्यानंतर ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. बिहारच्या निवडणुका आणि त्यानंतर हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर UPAच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी रिटायरमेंट घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. मात्र UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. खासदार राहुल गांधी यांना नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाला. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांना पंतप्रधापदाचे उमेदवार व्हावे यासाठी काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याची देखील चर्चा आहे. हेही वाचा...चित्रपटामध्ये घडावा असा थरार, पोलिसालाच चोरटा म्हणाला 'गुगल पे'वरून पैसे पाठव आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काहीसा अवकाश असला तरी काँग्रेस आतापासून तयारीला लागलं आहे. 2019मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा UPA कडून करण्यात आला होता. मात्र त्या निवडणुकीत काँग्रेसचा धोबीपछाड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत माघार घेतली. त्यानंतर पुन्हा सगळी सूत्र सोनिया गांधींच्या हाती गेली. मधल्या काळात यावरून अनेक वाद आणि गटबाजी देखील झाली पण UPA अध्यक्षपदाची जबाबदारी येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याबाबत सर्वाचं एकमत होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ajit pawar, Maharashtra, Sharad pawar

पुढील बातम्या