मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद जाणार का? अजित पवार म्हणाले...

काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद जाणार का? अजित पवार म्हणाले...

 काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्रिपद सुद्धा काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा रंगली आहे.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्रिपद सुद्धा काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा रंगली आहे.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्रिपद सुद्धा काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा रंगली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 04 फेब्रुवारी : काँग्रेसमध्ये (Congress) प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्रिपद सुद्धा काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण, राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी 'अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही', असं म्हणत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी शेतकरी आंदोलन आणि एल्गार परिषदेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पत्रकारांनी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा आहे, याबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, 'अशा बातम्यात काही तथ्य नाही आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना समसमान कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसारच आघाडी सरकारचे काम सुरू आहे. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याप्रमाणे पुढे कामकाज होणार आहे' असं अजितदादांनी स्पष्ट केले.

'देशात पेट्रोलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. स्वतःच अपयश लपण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली.

'वीज थकबाकीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 45000 हजार कोटी थकबाकी शेतकऱ्यांची बाकी होती. शेतकऱ्यांनी आता फक्त 15000 कोटी भरायचे आहेत. 15000 हजार कोटी विलंब चार्जमाफ करण्यात आले आहेत. 15000 कोटी  सरकार भरणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

'एल्गार परिषदेबाबत सरकार नरमाईची भूमिका अजिबात घेत नाही आहे. या प्रकरणात शरजील उस्मानी याच्या विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आपले काम चोखपणे पार पाडत आहे, असंही अजितदादांनी सांगितलं.

'नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. लोकसभा निवडणूक सुद्धा ईव्हीएम मशीनद्वारेच होत असते. सर्वत्र कॅशलेस निवडणुका घेण्याचे सुरू आहे. आता सर्वत्र मशीनद्वारे मतदान होत असताना तश्याच पद्धतीने मतदान व्हायला पाहिजे', अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडली.

केंद्राचा अर्थसंकल्प कुठेही समाधान करणारा नाही आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. सत्ताधारी समर्थन करतील, विरोधक निषेध करतील.  नाशिक आणि नागपूरला मेट्रो दिली आहे. पण ठाणे मेट्रोला निधी द्याला हवा होता. पुणे मेट्रोसाठी काही तरी घोषणा करायला हवी होती. ज्या राज्यात निवडणुका झाल्या तिथे निधी कमी दिला आहे. ज्या राज्यात आहे तिथे जास्त निधी दिला आहे.  निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली.

अहिंसेच्या अनुषंगाने एखादी व्यक्ती आंदोलन ठिकाणी जात असेल तर त्यांना रोखता कामा नये. जर एखादे भडकाऊ भाषण होणार असेल तर त्यांना रोखू शकतात. पण सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यांना तिथे भेटू द्यायला हवे होते, असंही अजित पवार म्हणाले.

First published: