S M L

होऊन जाऊ दे !, अजित पवारांची सेनेला सरकार स्थापनेची आॅफर

कर्जमाफीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची शिवसेनेला चक्क सरकार स्थापनेची ऑफर दिलीये.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 07:41 PM IST

होऊन जाऊ दे !, अजित पवारांची सेनेला सरकार स्थापनेची आॅफर

25 जुलै : कर्जमाफीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची शिवसेनेला चक्क सरकार स्थापनेची ऑफर दिलीये. तुमचे 62 आमचे 80 चला होऊन जाऊ द्या असं जाहीर आव्हानचं अजितदादांनी दिलंय.

अधिवेशनात आज अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला चांगलंच धारेवर धरलं. एककीकडे कर्जमाफीची घोषणा करायची आणि दुसरीकडे वेगवेगळे निकष लावायचे नेमकं सरकारच्या मनात आहे तरी काय ?  आता शिवसेना सांगतेय 2017 पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत या, तुमचे 62 आम्ही 80-82 चला ठराव मंजूर करून टाकू, होऊन जाऊ दे...त्यात 145 मॅजिक फिगर झाली की मग झालं काम अशी आॅफरच अजित पवारांनी दिली.

तसंच काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आकड्याचे गणित जमवू आणि सरसकट थेट कर्जमाफी देऊ पण तुमची तयारी आहे का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थितीत केला.शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळलंय. देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना तृतीय श्रेणीत टाकलं मग त्यांना  कर्जमाफी दिली का जात नाही. कशा पद्धतीने सरकार चाललंय. यात जवानांची काय चूक आहे. त्यांना कर्जमाफी का दिली नाही. अधिकाऱ्यांनी नुसतं होय म्हटलं की काढा जीआर, अधिकाऱ्यांनी सांगितलं की मारा कोंबडा तर मारला कोंबडा...अशा पद्धतीने सरकार नाही चालत असा सल्लावजा टोलाही अजित पवारांनी यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 05:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close