VIDEO : 'राजा'ला अजितदादा देणार साथ, केलं मोठं वक्तव्य!

VIDEO : 'राजा'ला अजितदादा देणार साथ, केलं मोठं वक्तव्य!

महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्यास काँग्रेसचाही तीव्र विरोध आहे. महाआघाडीचे दरवाजे मनसेसाठी बंद झाले असले तरी अजित पवारांनी राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन....

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्पष्ट केलं असतानाच, पवार काकांचे पुतणे अजित दादांनी मात्र, राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन केल्यानं राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'मताचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं' असं विधान अजित पवारांनी केले आहे. आता राज ठाकरे अजित पवारांच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्यास काँग्रेसचाही तीव्र विरोध आहे. महाआघाडीचे दरवाजे मनसेसाठी बंद झाले असले तरी अजित पवारांनी राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन का केलं? असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीत शरद पवार यांनी, 'राज ठाकरे हे आमच्यासोबत आता जरी दिसत असले तरी आगामी काळात आमच्यासोबत येतील असं दिसतं नाही' असं सांगितलं होतं. त्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली होती.

राज ठाकरे यांनी सोमवारीच कृष्णकुंजवर सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठकही बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं कळतं आहे. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी सावध प्रतिक्रिया दिली. 'लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. निर्णय झाला की स्वत: जाहीर करणार आहे,' असं राज यांनी सांगितलं.

तीन जागा लढवणार?

परंतु, राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष लोकसभा निवडणुकीत तीन जागांवर लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या तीन जागा नक्की कोणत्या आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, यामध्ये मुंबई आणि नाशिकच्या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत?

मनसे आणि राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत उघड आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. कारण, या आघाडीला काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये अंतर्गत समझोता होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीकडून मनसेचा उमेदवार असलेल्या ठिकाणी कमकुवत उमेदवार देऊन मनसेला अप्रत्यक्ष मदत केली जाऊ शकते.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 06:44 PM IST

ताज्या बातम्या