अजित पवार हे माझे बॉस नाहीत - अशोक चव्हाण

अजित पवार हे माझे बॉस नाहीत - अशोक चव्हाण

'पृथ्विराज चव्हाण यांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यपद दिल्यास काहीही हरकत राहणार नाही.'

  • Share this:

मुंबई 06 जानेवारी : महाराष्ट्रातल्या सत्ता प्रयोगावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अनेक खुलासे केले आहेत. सुरुवातीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या पाठिंबा देण्यासाठी तयार नव्हत्या. मात्र नंतर किमान समान कार्यक्रम तयार करण्याचं ठरल्याने त्यांनी पाठिंबा दिला असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तर मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी ते माझे बॉस नाहीत. आम्ही सगळेच सहकारी आहोत. अजित पवारांशी माझे उत्तम संबंध आहेत असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, किमान समान कार्यक्रम झाला नसता तर दररोज भांडणं झाली असती. त्यामुळे घटनेच्या चौकटीत बसेल असा विकास कार्यक्रम आम्ही तयार केलाय. त्यानुसारच सरकारचा कारभार चालणार आहे. अजित पवारांची कार्यशैली ही वेगळी आहे. त्यांचा स्वभाव हा वेगळा आहे. त्यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत. आमचा बॉस कुणीही नाही आम्ही सर्व सहकारी आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांचा अनुभव दांडगा आहे. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून घेतील. त्यांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यपद दिल्यास काहीही हरकत राहणार नाही असंही ते म्हणाले. राज्यात उद्योगांना पायभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माझा विभाग प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

असा आहे 'मनसे'चा नवा झेंडा, 23 जानेवारीला राज ठाकरे करणार मोठी घोषणा

भाजप हा काँग्रेसचा एक नंबरचा शत्रू आहे. त्यामुळे आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो आणि हेच गणित आम्ही सोनिया गांधी यांना सांगितलं आणि नंतर आघाडी झाली. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे थोडा विलंब झाला. आमचे निर्णय हे दिल्लीत होतात त्यामुळे थोडा विलंब लागतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 6, 2020, 9:41 PM IST

ताज्या बातम्या