Home /News /mumbai /

'काय झाडी...काय हाटील', म्हणत अजित पवार यांनी शहाजीबापूंना दिला सल्ला, बंडखोरांनीही बजावले

'काय झाडी...काय हाटील', म्हणत अजित पवार यांनी शहाजीबापूंना दिला सल्ला, बंडखोरांनीही बजावले

'आमदारांना सुरतला जाण्यासाठी मिळालं, त्यानंतर गुवाहाटीला जाण्याची संधी मिळाली तिथून थेट गोव्यात आले. आमदारांच्या हयातीमध्ये इतकं फिरायला मिळालं नसेल

    मुंबई, 04 जुलै : शहाजीबापू पाटील म्हणाले काय झाडी काय डोंगर...काय हाटील...बापू आपण एकत्र निवडणूक लढलो होतो.आपण लगेच बोलायची गरज नाही, टीका करण्याची गरज नाही. ही मोठी लोकं कधी एकत्र होतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही राहाल मग पाठीमागे,असा सल्लावजा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांना लगावला. शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस यांच्या भाषणाचा समाचार घेत जोरदार टोलेबाजी केली. 'आमदारांना सुरतला जाण्यासाठी मिळालं, त्यानंतर गुवाहाटीला जाण्याची संधी मिळाली तिथून थेट गोव्यात आले. आमदारांच्या हयातीमध्ये इतकं फिरायला मिळालं नसेल. कुटुंबांसोबत गेले असतील तो भाग वेगळा. त्यात शहाजीबापू पाटील म्हणाले, काय झाडी काय डोंगर...काय हाटील...बापू आपण एकत्र निवडणूक लढलो होतो. आपण लगेच बोलायची गरज नाही, टीका करण्याची गरज नाही. ही मोठी लोकं कधी एकत्र होतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही राहाल मग पाठीमागे, मग आम्ही कधी म्हटलोच नाही असं म्हणतील. दीपक केसरकर यांचं मी कौतुक केलं. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली, तेव्हा हॉटेलमध्ये सगळे नाचले एवढंच काय तर टेबलावर उभं राहून आमदार नाचले होते. पण हे बरोबर नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आपण लोकांचं प्रतिनिधी करत असतो, ती लोक आपल्याला पाहत असतात. त्यावेळी केसरकरांनी दिलगिरी व्यक्त केली. ते बरं केलं, तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार होते, त्यामुळे हे पुढे आलं नाही, असा टोलाही अजितदादांनी लगावला. पट्टीत बोलणारे अब्दुल सत्तार तर काही बोलायला तयार नाही. मागे बिर्याणी खाण्यासाठी जातो एवढंच सांगितलं होतं. आम्ही दोघे सोबतच बसलो होतो. त्यावेळी सत्तार हे माझ्या आणि जयंत पाटील यांच्यासोबत दोन तास गप्पा मारत होते. त्या नंतर ते सुरतला निघून गेले, असा खुलासाही अजितदादांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या