Home /News /mumbai /

नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत बोलले?

नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत बोलले?

गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई, 12 जुलै : या ना त्या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारला (mva goverment) अडचणीत आणणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्यावर पाळत ठेवण्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर पाळत ठेवण्याचा केलेला आरोप हा महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. खरंच?, केंद्र सरकारच्या नव्या स्कीममुळे तुम्हीही सुरु करता पोस्ट ऑफिस नाना पटोले यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या  नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. तर, नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात नाही. जो नेता असतो त्याच्या माहिती गोळा केली जाते. नाना पटोले यांनी ही माहिती करून घ्यावी. आवश्यकता वाटली तर याबद्दलची माहिती काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री यांच्याकडून घ्यावी त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पटोले यांनी लगावला. काय म्हणाले नाना पटोले? 'त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते', असा दावाच पटोले यांनी केला आहे. ENG vs PAK : गळ्यातल्या लॉकेटमुळे पाकिस्तानचा हसन अली पुन्हा चर्चेत तसंच, 'राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्त करणार' असंही पटोले म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Congress, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

    पुढील बातम्या