मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, कॅबिनेट बैठकीत अजितदादा संतापले, काँग्रेस मंत्र्याच्या भूमिकेवर नाराज!

मोठी बातमी, कॅबिनेट बैठकीत अजितदादा संतापले, काँग्रेस मंत्र्याच्या भूमिकेवर नाराज!

 कॅबिनेट बैठकीतही आज यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याचं समजते.

कॅबिनेट बैठकीतही आज यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याचं समजते.

कॅबिनेट बैठकीतही आज यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याचं समजते.

मुंबई, 19 मे : पदोन्नतीत आरक्षण जीआर (Promotion reservation GR) वरून पुन्हा एकदा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) मतभेद समोर येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Goverment) आज कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीतच नितीन राऊत यांनी पदोन्नती आरक्षणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नतीत आरक्षणाला स्थगिती देण्याचा जीआर 7 मे रोजी काढला होता. त्याविरोधात या विषयातील उपसमितीत आज चर्चा झाली. या बैठकीत पदोन्नतील आरक्षण जीआरला तूर्तास स्थगिती दिली जावे, अंमलबजावणी करू नये अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. मात्र, बैठकीत असं काहीच ठरले नसताना नितीन राऊत यांनी भूमिका मांडल्याने अजित पवार नाराज झाले.

कोरोनामुळे आणखी एका क्रिकेटपटूचा मृत्यू, 10 दिवसांपूर्वी वडिलांचं निधन

नितीन राऊत आणि अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीच्या संदर्भात नितीन राऊत यांच्या जनसंपर्क खात्याकडून संबंधित जीआरला स्थगिती देण्यात आल्याचे भाष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रसिद्धी पत्रकामध्ये नितीन राऊत यांची आगपाखड उपमुख्यमंत्री यांच्यासमोर नाराजी अशा स्वरूपाचे भाष्य करण्यात आले आहे. यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भातल्या जीआरला स्थगिती देण्याचा कोणताही निर्णय तूर्तास झाला नाही, असंही समजते. या बैठकीत अजित पवार आणि राऊत यांनी वेगवेगळी मतं उपस्थितीत केली.  या मुद्दावरून दोन्ही नेत्यांमध्ये नाराजीचा भडका उडाला. कॅबिनेट बैठकीतही आज यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याच समजते.

अवेळी दुधाचं सेवन ठरू शकतं घातक; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

यापूर्वी सुद्धा वीज दरवाढ सवलत भूमिका नितीन राऊत यांनी मांडली होती. पण वित्तमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. विज बिलामध्ये सवलत देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. पण त्याला वित्तमंत्री अजित पवार यांनी रेड सिग्नल दिला होता. यामुळे देखील राऊत विरुद्ध अजित पवार असा संघर्ष त्यावेळेस पाहायला मिळाला होता. आता परत एकदा पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यामध्ये वेगवेगळी मतं समोर येताना दिसत आहेत. पद्दोन्नती आरक्षण यावरून नितीन राऊत आग्रही असतानाच पण असं काही झाले नाही, अशी भूमिका अजित पवार यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

First published: