Home /News /mumbai /

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं की....

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं की....

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस? अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं....

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस? अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं....

Ajit Pawar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच मनसेला राष्ट्रवादीची फूस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवाच्या सभेतून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही थेट निशाणा साधला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने एकप्रकारे शिवसेनेची कोंडी होताना दिसत आहे. त्याच दरम्यान विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे की, मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) फूस आहे. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेला फूस असती तर पवार साहेबांना राज ठाकरेंनी जातीयवादी म्हटलं असतं का? हे साधं गणित आहे आणि सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तरी तो उत्तर देईल. अजित पवारांनी पुढे म्हटलं, राज ठाकरे भाषण करताना भाजपवर टीका करत नाहीयेत तर केवळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. आज राज ठाकरेंचा तोच अजेंडा दिसत आहे. लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यांनी भाजपलाच टार्गेट केलं होतं. त्यावेळी आघाडीच्या उमेदवारांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन करणाऱ्या सभा ते घेत होते. वाचा : भाजप-राष्ट्रवादी युतीच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "मग इतकी वर्षे कशाला..." भाजप-राष्ट्रवादी युतीच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेबाबत 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर जागावाटप आणि खातेवाटपाच्या संदर्भातही चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. त्यावर अजित पवार म्हणाले, 2017 सालीच सांगायचं होतं ना? मग इतके दिवस कशाला 5 वर्षे थांबलात? मला एक कळत नाही की, आता आपण 2022 मध्ये आहोत आणि 2017 मध्ये असं असं... आता मग 2017 मध्ये आत्ताचे बरेच नेते इकडे तिकडे होते. त्यांची त्यावेळी वक्तव्ये वेगळी होती आणि आता वेगळे आहेत. मागच्या गोष्टी काढून काय उपयोग. महाराष्ट्रातील प्रश्न काय महत्त्वाचे आहेत ते आधी पाहूयात. 2017 ला तसं झालं... 2012 ला तसं झालं...2010 ला तसं झालं... यामध्ये कुणाला रस नाहीये. आज काय आहे... आजप आपल्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत याबाबत चर्चा झाली पाहिजे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ajit pawar, BJP, MNS, NCP, Raj Thackeray

    पुढील बातम्या