काट्याने काटा काढायचा असतो, फोडाफोडी पुढे होईल, अजित पवारांचा भाजपला इशारा

'आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा किंवा नाही यावर निर्णय आमचे सर्वोच्च नेते शरद पवारच घेतील.'

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 07:33 PM IST

काट्याने काटा काढायचा असतो, फोडाफोडी पुढे होईल, अजित पवारांचा भाजपला इशारा

मुंबई 30 सप्टेंबर : काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातलं राजकारण अनेक वळणं घेतय. पंढरपूरमधले काँग्रेसचे आमदार भारत भालके आत्तापर्यंत भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं. भालकेंनी तशी पूर्वतयारीही केली होती. मात्र स्थानिकांचा विरोध वाढल्याने भालकेंनी आता राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीला गळती लागलीय अनेक दिग्गज पक्ष सोडून गेलेत. त्या पार्श्वभूमीवर भारत भालकेंचं राष्ट्रवादीत येणं हे पक्षाला दिलासा देणारं ठरणार आहे. भारत भालकेंना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवारांनी भाजपला दे धक्का दिलाय अशी चर्चा आहे.

'ठाकरे' पहिल्यांदाच निवडणूक लढणार; विधानसभेच्या आखाड्यात आदित्य यांची एण्ट्री

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, काट्याने काटा काढायचा असतो, त्यांनी सुरूवात केली तेच घडेल. आता फोडाफोडी पुढे होईल. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा किंवा नाही यावर निर्णय आमचे सर्वोच्च नेते शरद पवारच घेतील. सातारा लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाला आहे. पवार साहेब स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. सातारा जागा राष्ट्रवादीची आहे. पृथ्विराज चव्हाण हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

SPECIAL REPORT : राणेंच्या राजकीय अस्थिरतेचे 'दशावतार' कधी संपणार?

भाजप अजित पवारांविरोधात गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देणार आहे अशी या चर्चेवर ते म्हणाले, राज्यातील कोणी कोठे ही उभा राहू शकतो. मी निवडणूक लढवताना समोरील उमेदवार तुल्यबळ आहे असं मानतो. चंद्रकांत पाटील, पडाळकर यांच  बारामतीत स्वागत आहे असंही ते म्हणाले.

Loading...

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी 175 जास्त जागा जिंकेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामतीत जो कोणी उमेदवार देऊ तो 1 लाखांपेक्षा जास्त मताने जिंकेल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...