Home /News /mumbai /

महाविकास आघाडीची चिंता वाढली; अजित पवार, छगन भुजबळ बहुमत चाचणीला गैरहजर राहणार?

महाविकास आघाडीची चिंता वाढली; अजित पवार, छगन भुजबळ बहुमत चाचणीला गैरहजर राहणार?

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीबाबत काही वेगळी व्यवस्था केली जाते का हे देखील पाहावं लागेल. आमदार उपस्थितीत आहे याची शिरगणना करावी असा आदेश राज्यपालांनी दिला आहे.

    मुंबई, 29 जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  (Governor Bhagat Singh Koshyari)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला (Floor Test) गैरहजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन्ही प्रमुख नेते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचं असताना दोन्ही नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीबाबत काही वेगळी व्यवस्था केली जाते का हे देखील पाहावं लागेल. किती आमदार उपस्थितीत आहे याची शिरगणना करावी असा आदेश राज्यपालांनी दिला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांबाबत काय निर्णय घेतला जातो हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक (NAwab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील उद्या उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचं असताना, राष्ट्रवादीच्या या चार नेत्याबद्दल काय निर्णय घेतला जाईल पाहावं लागेल. भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश भारतीय जनता पक्षानं सर्व आमदारांना संध्याकाळपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. उद्या होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनापूर्वी राज्यपालांनी हा आदेश दिला आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आज (बुधवार) दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीला फडणवीसांसह चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार , आशिष शेलार, गिरीश महाजन हे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाबाबत पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. भाजपाकडून घटनाविरोधी काम 'राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीचं पत्र मागील गेल्या अडीच वर्षापासून पडून आहे. त्यावर अद्याप निर्णय होत नाही. मात्र बहुमत सिद्ध करण्याबाबत राज्यपालांनी प्रचंड वेगाने आदेश दिले. भाजप घटनाविरोधी काम करत आहे. सरकार डळमळीत होण्याची भाजप वाट पाहत होतं. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत असल्याचं त्यांना वाटत आहे. मात्र हे इतकं सहज आणि सोपं नाही,' असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असंवैधनिक असून याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Ajit pawar, Chagan bhujbal, Shivsena

    पुढील बातम्या