Mumbai Rains: भाजप सरकार मुंबईकरांचा अंत पाहतंय- अजित पवार

Mumbai Rains: भाजप सरकार मुंबईकरांचा अंत पाहतंय- अजित पवार

सत्ताधारी पक्षातील आमदारांना साधे सभागृहातही यायला वेळ नाही. त्यांना इतर ठिकाणी भटकायचेच असते

  • Share this:

मुंबई, 10 जुलैः एकीकडे मुंबईकर सतत दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे वैतागलेला असताना पालिका आणि राज्य सरकार मात्र गप्प बसली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळा सुरू होण्याआधी दरवर्षी एक आढावा बैठक होते, त्यात सर्व विभागांतील लोक असतात. मात्र विभागांकडून काम नीट होत नसल्यामुळेच हा सर्व प्रकार घडल्याचे अजित पवार म्हणाले.

महापालिका आणि राज्य सरकारपेक्षा हवामान खात्याला मुंबईकरांची जास्त काळजी आहे, असे पवार म्हणाले. मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून जी खबरदारी घ्यावी लागते त्यामध्ये सरकार नेहमीच कमी पडत आलं आहे. या संपूर्ण गदारोळात मंत्री कुठेच दिसत नाहीत. एवढंच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारांना साधे सभागृहातही यायला वेळ नाही. त्यांना इतर ठिकाणी भटकायचेच असते.

अजित पवारांच्या या विधानावर आपलं मत देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की, 'विरोधकांनी आम्हाला काम करण्याचा सल्ला देण्याची काहीही गरज नाही. यंत्रणांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. एकीकडे अजित पवार म्हणतात की मंत्र्यांनी मुंबईत असणे आवश्यक आहे तर दुसरीकडे सभागृहात मंत्री नाही म्हणून टीकाही करत आहेत. विरोधकांनी लोकांना पॅनिक करण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही सर्व सेवा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.'

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 2 तासांपासून नालासोपारा स्टेशनवर एकही ट्रेन नसल्यामुळे चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतुक अर्धा तास उशिराने सुरू असून मध्य आणि हार्बरची वाहतुकही धिम्या गतीनं सुरू आहे.

हेही वाचाः

पावसामुळे जागोजागी कोंडी, घराबाहेर न पडण्याचा सल्ला

पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून

भरपावसात लोकस सुसाट

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 10:59 AM IST

ताज्या बातम्या