मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Winter Session: सभागृहात सदस्यांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अजित पवारांनी दर्शवली नाराजी

Winter Session: सभागृहात सदस्यांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अजित पवारांनी दर्शवली नाराजी

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

हिवाळी अधिवेशनात अनेक सदस्यांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याचं पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी दर्शवली आहे.

मुंबई, 23 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू आहे. या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. सदस्यांनी मास्क न घतल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी नाराजी दर्शवली आहे. तसेच सर्वांना मास्क घालण्याची विनंतीही केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अध्यक्ष महोदय मला एका विषयाकडे आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे. कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालं आजचा दुसरा दिवस आहे. आपण लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो. देशाचे पंतप्रधान सुद्धा सध्याच्या कोरोनाच्या संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत आणि रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा देशपातळीवर सुरू आहे. ठराविक लोक सोडली तर कुणीही येते मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललं आहे हे पाहतोय. जर आपणच मास्क लावू शकत नाही तर...

वाचा : Aaditya Thackeray: मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मी बोलताना पण मास्क लावतो. काहींना मास्क लावून बोलण्यात अडचणी येत असतील तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण बोलून झाल्यावर तरी मास्क लावला पाहिजे. आज इतकी वाईट परिस्थिती आहे की, परदेशात दीड दिवसाला दुप्पट रुग्णांची संख्या होत आहे. डब्ल्यूएचओने सांगितलं आहे की, पाच लाखांपर्यंत परदेशात लोक मृत्यूमुखी पडतील. हे झालं परदेशाचं आपलं महाराष्ट्र आणि देशाचं काय. काही काही गोष्टी ज्या त्या वेळीच त्यातं गांभीर्य लक्षात घेऊन.. कुणी जर मास्क लावला नसेल मग मी जरी मास्क नसेल लावला तरी मला बाहेर काढा, कुठंतरी गांभीर्याने घ्याना. माजी विरोधी पक्षनेते आणि सर्वांनाच विनंती आहे की, मास्क लावा.

अजित पवारांनी हे म्हटल्यानंतर अध्यक्षांनीही म्हटलं, सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की, सर्व सदस्यांनी आपले मास्क बोलण्यापूरते बाजूला करावे किंवा ज्याला शक्य आहे त्याने तोंडावर कायम मास्क ठेवावे.

वाचा : मंत्री आदित्य ठाकरेंसह नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, चौकशीसाठी SIT स्थापनेची गृहमंत्र्यांची घोषणा

देशभरात पुन्हा रात्रीची संचारबंदी?

भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना वॉर रूम सक्रिय करण्यास सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी वैज्ञानिक अहवालांच्या आधारे राज्यांना सांगितलं आहे, की ओमायक्रॉन कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट जास्त संसर्गजन्य आहे. केंद्र सरकारनं म्हटले आहे की, भारतातील अनेक भागात अजूनही डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणं समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर राज्य सरकारांनी दूरदृष्टी, डेटा विश्लेषणासह कठोर आणि त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Face Mask, Winter session