• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राष्ट्रवादीत अजित पवार आणि पार्थ नाराज? जयंत पाटील यांनी केला मोठा खुलासा!

राष्ट्रवादीत अजित पवार आणि पार्थ नाराज? जयंत पाटील यांनी केला मोठा खुलासा!

शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर नाराजी प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती.

  • Share this:
मुंबई 13 ऑगस्ट: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार आणि पार्थ हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार किंवा पार्थ पवार हे नाराज नाहीत त्यामुळे मानण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पार्थ पवार कुठला निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही. घरवापसीच्या मुद्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. पण सर्व बाबी विचारात घेऊन निर्णय घेणार आहोत. याबाबत बोलणी सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. काय आहे प्रकरण? 'पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,' असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले. मात्र त्यानंतर भाजप नेत्यांनी पार्थ पवार यांना समर्थन द्यायला सुरुवात केली. पायलट परतले तरी धोका कायम, भाजपच्या 'अविश्वासा'मुळे काँग्रेसचा जीव टांगणीला 'आज परत सांगतो..पार्थ.. लंबी रेस का घोडा है...थांबू नकोस मित्रा,' असं म्हणत नितेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादावर भाष्य केलं. त्यानंतर आता पद्मसिंह पाटील यांचे नातू आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनीही पार्थ पवार यांचं जोरदार समर्थन केलं आहे. ‘आधी घर सांभाळा’, राष्ट्रवादीच्या 'मिशन घरवापसी'वर भाजपचा पलटवार 'तुम्ही जन्मत: योद्धे आहात, हे मी माझ्या बालपणापासून पाहात आलोय. मला तुमचा अभिमान आहे. आम्ही उस्मानाबादमधून आहोत...आपल्याला माहीत आहे कसं लढायचं,' अशी फेसबुक पोस्ट मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्या समर्थनार्थ लिहिली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: