मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीत हालचालींना वेग, अजितदादा, जयंत पाटील पोहोचले शरद पवारांच्या भेटीला!

मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीत हालचालींना वेग, अजितदादा, जयंत पाटील पोहोचले शरद पवारांच्या भेटीला!


शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लगबग पाहण्यास मिळाली आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लगबग पाहण्यास मिळाली आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लगबग पाहण्यास मिळाली आहे.

मुंबई, 27 मे : कोरोनाशी (Corona) लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी वाढल्या आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीत (NCP) हालचालींना वेग आला आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लगबग पाहण्यास मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील पोहोचले आहे. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आईच्या मृत्यूनंतरही कर्तव्यात कसूर नाहीच, रुग्णवाहिका चालकाचं होतंय कौतुक

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. सायंकाळी 5.30 ते 6.10 वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

आफ्रिका खंडातील राजाला आहेत 15 राण्या आणि 35 मुलं, आवडेल तिच्याशी करतो लग्न

राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तसंच केंद्र सरकारकडून राज्याला कोविड 19 संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

First published:
top videos

    Tags: Sharad pawar, Uddhav thackeray