मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

खातेवाटपावरुन अजित पवार आणि अशोक चव्हाणांमध्ये तू तू-मै मै?

खातेवाटपावरुन अजित पवार आणि अशोक चव्हाणांमध्ये तू तू-मै मै?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी करण्यात आली होती.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी करण्यात आली होती.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी करण्यात आली होती.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 3 जानेवारी: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये खातेवाटपावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. आता याबाबत तोडगा निघाला असून तिन्ही पक्षांनी आपल्या वाट्याला आलेली खाती आणि पालकमंत्र्यांची यादी तयार केली आहे. याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार आहेत. मात्र, खातेवाटपावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते आणि अजित पवार यांच्या वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाणांमध्ये तूतू-मैमै? झाल्याचे समोर आले आहे.

पृथ्वीराज चव्हाण ठरले वादाचे कारण?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी करण्यात आली होती. नंतर अजित पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख केला. यावरुन अशोक चव्हाण संतापले आणि म्हणाले पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाहीत, मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे तुम्हाला जे बालयचे आहे, ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला, असे अशोक चव्हाण अजित पवारांना सुनावले. त्यानंतर अजित पवारांनी परत पृथ्वीराज चव्हाणांचा विषय काढत ते संयमी नेते असल्याचे म्हटले. त्यावरुन वाद उफाळला. तसेच पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असेही अजित पवार म्हणाले. त्यावरुन चिडलेल्या अशोक चव्हाणांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार म्हणाले, वाद झाल्याची बातमी धादांत खोटी

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी आहे. मी त्या वृत्तपत्राच्या संपादकांशी बोललो. त्यांच्या इतर सहकाऱ्यांशीही बोललो. तुम्ही माझ्या बोलल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याशी बोला. अशोक चव्हाण यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी एकेकाळी ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सहकारी म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मी ही बातमी देणाऱ्या संबंधित वृत्तपत्राच्या प्रमुखांशी बोललो. संपादकांशी बोलल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही बैठकीला नव्हते. जयंत पाटील, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि शिवसेनेचे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हजर होते.

यावेळी आमच्यात भांडायचे, वाद घालायचे कारण काय? राष्ट्रवादीला जी खाती मिळाली ती मिळालीच आहेत. अजून एक महत्त्वाचे खातं राष्ट्रवादीला दिले जाणार होतं, ते विस्तारवाढीला देण्याचे ठरले होते, अशा शब्दात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Ashok chavan, Latest news, Maharashtra news