Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे गटाला झटका; गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता, आमदारांवरील कारवाईबाबत हा निर्णय

एकनाथ शिंदे गटाला झटका; गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता, आमदारांवरील कारवाईबाबत हा निर्णय

गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे.

    मुंबई 24 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासाठी आता एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. अजय चौधरी यांची गटनेते पदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे. 'तुमच्या कारवाईच्या मागणीचा परिणाम आमदारांवर होणार नाही'; एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण आज अपात्र आमदारांला नोटीस देऊन ऑनलाइन सुनावणी होणार आहे. एका दिवशी 4 आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत नेमकी काय कारवाई होऊ शकते? विधानमंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार 1) शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधानसभा उपांध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या 12 आमदारांना नोटीस देऊ शकतात 2) आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नोटीसबाबत नेमकं त्या आमदारांचं काय म्हणणं आहे, याबाबत जाणून घेणार 3) कोरोनानंतरदेखील आमदारांना ऑनलाईन सुनावणी हवी आहे की राहू ते स्वतः याठिकाणी येऊन सुनावणीसाठी उपस्थित राहाणार हे ठरवलं जाणार आहे. गुवाहटीत शिवसेना नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न अपयशी 4) जर ते ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थीती या बँडविडथची उपलब्धता पाहता दिवसाला केवळ 2 किंवा 4 आमदारांची सुनावणी पार पडू शकते. 5) ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही माञ विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न होणारं आहेत
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या