News18 Lokmat

मुंबई विमानतळावरील शेकडो उड्डाणे रद्द, कंपन्यांनी तिकीट दर दुपटीपेक्षा जास्त वाढवले

हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 05:05 PM IST

मुंबई विमानतळावरील शेकडो उड्डाणे रद्द, कंपन्यांनी तिकीट दर दुपटीपेक्षा जास्त वाढवले

मुंबई, 10 फेब्रुवारी: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या देखभाल व दुरुस्तीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच आता प्रवाशांना तिकीट दर वाढीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जगातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीसाठी सकाळी 11 ते संध्याकाळ 5 वाजेपर्यंत बंद ठेवली जाते. यामुळे एका दिवशी साधारण 230 विमाने रद्द करण्यात येत आहेत. या दुरुस्तीचा फटका विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगला बसत आहे. त्याच बरोबर 33 टक्के विमानांना उशीर होत आहे. विमानतळावरील बिघडलेल्या या वेळापत्रकाचा प्रवाशांच्या नियोजनावर देखील होत आहे. त्यातच विमानांची कमतरता आणि वर्दळीमुळे विमान कंपन्यांनी तिकीट दर दुपटीपेक्षा जास्त वाढवले आहेत. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

- मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत. ज्या एकमेकांना क्रॉस करतात. त्यामुळे एका वेळी एकच विमान लँडिंग किंवा टेकऑफ करू शकतं.

- वर्दळीच्या वेळी दर पाच मिनिटांना 4 विमानांची वाहतूक होते. ज्यामध्ये 2 लँडिंग, 2टेक ऑफचा समावेश आहे.

Loading...

- 2 विमानांच्या वाहतुकीदरम्यान हवाई वाहतूक नियंत्रकाला केवळ 65 सेकंद मिळतात.

- मुंबई विमानतळावर रोज दर तासाला 46 विमानं हाताळण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात शुक्रवारी सकाळ-संध्याकाळ दर तासाला 50 विमानांचं लँडिंग किंवा टेकऑफ होतं.

- एक धावपट्टी असलेलं सगळ्यात व्यस्त विमानतळाचा जागतिक रेकॉर्ड यापूर्वीही मुंबईच्याच नावावर होता.

- याशिवाय प्रवाशांच्या ये-जाच्या आकडेवारीनुसार दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात पहिलं आणि मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.


VIDEO : भाजप खासदाराची जीभ घसरली; प्रियांका गांधींबाबत केलं 'हे' वक्तव्य


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...