मुंबईत एअरहॉस्टेसचा सामूहिक बलात्काराचा आरोप, एकाला अटक

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 11:46 PM IST

मुंबईत एअरहॉस्टेसचा सामूहिक बलात्काराचा आरोप, एकाला अटक

मुंबई, 05 जून : मुंबईतील एक खासगी एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या एअरहाॅस्टेसने आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने मित्रासोबत सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी एअरलाईन्समध्येच काम करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी ही आपल्यासोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्यासोबत एकत्र राहत होती. आरोपी हा तिच्या फ्लॅटमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. मंगळवारी रात्री आपल्यावर आरोपीने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला असा आरोप केला आहे.

तिने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेसोबत राहणारा आरोपी संदीप बादोडिया नावाच्या तरुणाला अटक केली आहे.  संदीपने आपला गुन्हाही कबूल केला आहे.  उद्या गुरुवारी संदीपला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस  करत आहे.


=======================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Rape
First Published: Jun 5, 2019 11:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...