Home /News /mumbai /

Air India देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचं बुकिंग सुरू करणार, या आहेत तारखा

Air India देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचं बुकिंग सुरू करणार, या आहेत तारखा

सुरुवातीला फक्त काही मोजक्याच आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही विमानं उड्डाण करणार आहेत.

    मुंबई 19 एप्रिल: लॉकडाऊमुळे सगळा देशच ठप्प झालाय. देशभर माणसं अडकून पडली आहेत. प्रत्येकाला प्रतिक्षा आहे ती विमान वाहतूक केव्हा सुरू होईल याची. Air Indiaने यासदंर्भात संकेत दिले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे 4 मे पासून Air India देशांतर्गत म्हणजेच Domestic फ्लाईट्सचं तर 1 जून पासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचं बुकिंग सुरू करणार आहे. सुरुवातीला फक्त काही मोजक्याच आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही विमानं उड्डाण करणार आहेत. तर मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता अशा महानगरांसाठी सेवा सुरू करण्याचा एअर इंडियाचा विचार आहे. 23 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. आता 3 मेनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असं असलं तरी काही दिलासादायक घटना घडत आहेत. देशातल्या 12 राज्यांमधल्या 22 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या 24 तासांमध्ये 991 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 43 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 14,378वर तर मृत्यूचा आकडा 480वर गेला आहे. यात 4,291 जण हे तबलिगी जमातशी संबंधीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - लॉकडाऊन असतानाच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मुंबई आणि पुणे हे सर्वाधिक रुग्ण संख्येची शहरं बनत आहेत. राज्यात आज 328 रुग्ण वाढले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 3648वर गेली आहे. यात सगळ्यात जास्त मुंबईत 184 रुग्ण वाढले आहेत. तर पुण्यात 78 रुग्णांची भर पडलीय. मुंबईत आज 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 125वर गेली आहे. कोरोनासारख्या महत्त्वाच्या विषयावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या आकडेवारीत एकवाक्यता नाही. मुंबई महापालिका दिवसभरात 87 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं सांगत आहे तर राज्य सरकारने दिलेल्या माहितीत तो आकडा 184 एवढा आहे. हे वाचा -  नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनी कंपन्यांना बसणार दणका कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने 17 रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरीक्त 4355 खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषीत केलेल्या 30 रुग्णालयातील 2305 खाटा आणि आताच्या 4355 खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Air india

    पुढील बातम्या