Elec-widget

एअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी

एअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी

एअर इंडियाला विमान अपहरणाची धमकी मिळाल्यानंतर आता हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी मुंबई, 23 फेब्रुवारी :  मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या ट्राफिक कंट्रोल रूमला एअर इंडियाचं विमान अपहरण करण्याची फोनवरून धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या फोन कॉलनंतर विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. या फोन कॉलनंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्लानंतर दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणू शकतात असा इशारा यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता विमान अपहरणाचा देखील फोन आल्यानं सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कंपन्यांना देखील खबरदारीने राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

धमकीच्या कॉलनंतर मुंबई विमानतळ परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अशी होतेय मुंबई विमानतळावर तपासणी

- येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी

Loading...

- विमानतळावरील प्रत्येक काना- कोपऱ्याची कसून तपासणी

- कार्गो, प्रवाशांचं सामान, बॅग्ज, कॅटरिंग आणि जेवणाचं देखील स्कॅनिंग

- परिसरामध्ये सीसीटीव्हीची करडी नजर.

 

VIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com