Air India च्या इंजिनीअरचा गुजरातमध्ये खून; तिकिटावरून पटली ओळख

Air India च्या इंजिनीअरचा गुजरातमध्ये खून; तिकिटावरून पटली ओळख

मृतदेहाच्या शर्टच्या खिशात पोलिसांना एअर इंडियाच्या फ्लाईटचे तिकीट सापडले.

  • Share this:

मुंबई,13 डिसेंबर: आधी माहीम आणि नंतर कल्याणमध्ये सुटकेसमध्ये कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या इंजिनीअरची गुजरातमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

दीपक पांचाळ (वय-59) असे हत्या झालेल्या इंजिनीअरचे नाव असून त्यांचा मृतदेह गोणीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुजरातच्या हलवद पोलिसांना ब्राह्मणी धरणात ही गोणी सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. मृतदेहाच्या शर्टच्या खिशात पोलिसांना एअर इंडियाच्या फ्लाईटचे तिकीट सापडले. PNR नंबरवरून तपास केला असता हा मृतदेह दीपक पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपक पांचाळ यांचे अपहरण करून गुजरातमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.

मिळालेली माहिती अशी की, दीपक पांचाळ हे एअर इंडियामध्ये इंजिनीअर होते. अंधेरी येथे राहणारे दीपक पांचाळ हे अविवाहित होते. ते मागील 29 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. पांचाळ यांच्या भावाने त्याबाबत अंधेरी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. बरेच दिवस शोध घेऊनही पोलिसांना पांचाळ यांचा थांगपत्ता लागत नव्हता. पांचाळ यांचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. चौकशी सुरू असतानाच गुजरातच्या हलवद पोलिसांना धरणात मृतदेह असलेली गोणी सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. मृतदेह पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी ही माहिती दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 13, 2019, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading