• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • अहमदनगर रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी कारवाईचा बडगा, 4 डॉक्टर निलंबित, 2 जणांची सेवा समाप्त

अहमदनगर रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी कारवाईचा बडगा, 4 डॉक्टर निलंबित, 2 जणांची सेवा समाप्त

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 08 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Ahmednagar Civil Hospital Fire) आयसीयू कोरोना कक्षाला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. अखेर या दुर्घटनेप्रकरणी  जिल्हा शल्य चिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन जणांची सेवा समाप्त करण्यात आल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट करून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या सहा जणांवर कारवाई 1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित 2. डॉ.सुरेश ढाकणे-  वैद्यकीय अधिकारी- निलंबित 3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी-  निलंबित 4.  सपना पठारे-  स्टाफ नर्स- निलंबित 5. आस्मा शेख -स्टाफ नर्स - सेवा समाप्त 6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त काय घडलं होतं? ६ नोव्हेंबर रोजी आयसीयू अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कक्षामध्ये 17 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू होता. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले.  आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा मृत्यू तर इतरही काही रुग्ण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: