मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अरे बापरे! हे काय भलतंच? टॉन्सिल शस्त्रक्रियेनंतर वेगळ्याच भाषेत बोलू लागली महिला

अरे बापरे! हे काय भलतंच? टॉन्सिल शस्त्रक्रियेनंतर वेगळ्याच भाषेत बोलू लागली महिला

टॉन्सिल काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया (Tonsils Surgery) केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील (Australia) ही महिला आयरिश पद्धतीने शब्दोच्चार (Irish Accent) करू लागली.

टॉन्सिल काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया (Tonsils Surgery) केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील (Australia) ही महिला आयरिश पद्धतीने शब्दोच्चार (Irish Accent) करू लागली.

टॉन्सिल काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया (Tonsils Surgery) केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील (Australia) ही महिला आयरिश पद्धतीने शब्दोच्चार (Irish Accent) करू लागली.

कॅनबेरा, 13 मे : एखादी शस्त्रक्रिया (Surgery) झाल्यानंतर रुग्णाला त्याच्या थोड्याफार प्रमाणात त्रास जाणवतो. पण कधी शस्त्रक्रियेनंतर कुणा रुग्णाची भाषा किंवा शब्दोच्चार बदलल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? ऑस्ट्रेलियातील एका महिलेच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं आहे. टॉन्सिल काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया (Tonsils Surgery) केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील (Australia) ही महिला आयरिश पद्धतीने शब्दोच्चार (Irish Accent) करू लागली.

ऑस्ट्रेलियातील जी मॅकेन. ऑपरेशननंतर दोन दिवसांनी आपण ऑस्ट्रेलियन पद्धतीने शब्दोच्चार करू शकत नसल्याचं तिच्या लक्षात आलं.  जी मॅकेनने आपला अनुभव व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जी मॅकेन म्हणते, "त्या दिवशी मी जागी झाले ते आयरिश पद्धतीने शब्दोच्चार करतच. मला त्या दिवशी हे एक विचित्र स्वप्न असल्याचा अनुभव आला" त्यानंतर पुढील दोन आठवडे तिनं संशोधन केलं. तसंच संपूर्ण घटनेचं दस्तावेजीकरण केलं, त्यादरम्यान ऑसी पद्धतीने शब्दोच्चार जात तिचे आयरिश पद्धतीने शब्दोच्चारण अधिक पक्कं होत असल्याचं तिला दिसून आलं.

डेली मेलच्या वृत्तानुसार, त्यानंतर मॅकेनला हा फॉरेन असेन्ट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome)असल्याचं सांगितलं. मेंदूला इजा झाल्याने हा सिंड्रोम होतो. या आजाराचा शोध 1907 मध्ये लागला असून आतापर्यंत या सिंड्रोमच्या केवळ 100 केसेस आढळून आल्या आहेत. मॅकेनला तज्ज्ञांनी अगदी ताठ, घट्ट बसून राहा आणि शरीर पूर्णपणे बरं होऊ द्या, असा सल्ला दिला.

हे वाचा - कसं शक्य आहे? प्रत्यक्ष Intercourse न करता फक्त मुखमैथुनामुळे 'ती' प्रेग्नंट

हे सर्व तिला अनैसर्गिक आणि विचित्र वाटलं. कारण तिच्या म्हणण्यानुसार ती कधीच आयर्लंडमध्ये गेलेली नाही. त्यानंतर तिने दुसरा एक व्हिडीओ (Video) शेअर केला. त्यात दुसऱ्या दिवशी ती ऑसी (Aussie) पद्धतीने शब्दोच्चार करु शकत होती. याला दुजोरा मिळावा यासाठी तिने काही मित्रांशी फोनवरुन संभाषण केलं. मात्र काही वेळानंतर ची पुन्हा आयरीश पद्धतीनेच शब्दोच्चार करू लागल्याचा दावा मॅकेन हिने केला आहे.

जसेजसे दिवस पुढे जाऊ लागले, तसेतसे आपण नैसर्गिक उच्चारण (Natural Accent) हरवून बसलो आहोत, अशी जाणीव तिला होऊ लागली. ती असा दावा करते, की "माझ्यात नैसर्गिक शब्दोच्चारांचा कोणाताही मागमूस नव्हता. मला ऑसी शब्दोच्चार कुठेच सापडत नव्हते आणि मी पूर्णतः आयरिश झाल्याचे मला जाणवलं"

तथापि मॅकेनच्या शब्दोच्चार बदलाच्या 9 व्या दिवशी ती म्हणते, "माझे शेवटचे दोन दिवस सुंदर नव्हते. मी सध्या ज्या प्रकारे शब्दोच्चार करत आहे, याबद्दल माझ्या मनात दुःख आहे"

हे वाचा - Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा

ताज्या व्हिडीओमध्ये वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं मॅकेनने कबूल केलं. "मला माझ्या जुन्या स्वभावाकडे परत जाण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मी धडपडत असल्याचं मॅकेनने स्पष्ट केलं. सध्या मला एका न्युरोलॉजिस्टची (Neurologist) माहिती मिळाली असून ते स्ट्रोक झालेल्या रुग्णांचे पुर्नवसनाचे तज्ज्ञ आहेत", आपल्या आजाराबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मॅकेनने सांगितलं.

First published:

Tags: Health, Lifestyle, Surgery