Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर 24 तासांत राज्यपालांचा 'तो' आदेश मागे

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर 24 तासांत राज्यपालांचा 'तो' आदेश मागे

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विशेष अधिवेशन बोलावले होते. परंतु,

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विशेष अधिवेशन बोलावले होते. परंतु,

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विशेष अधिवेशन बोलावले होते. परंतु,

    मुंबई, 30 जून : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्य राजकारणामध्ये अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. अखेर उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपल्या (Chief Minister Uddhav Thackeray resigns) राजीनामा दिला आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशनही रद्द करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी वर्तवली जात होती. अखेरीस न्यायालयायीन लढाईच्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अखेरचा जय महाराष्ट्र केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विशेष अधिवेशन बोलावले होते. परंतु, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जूनच्या रात्री राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडून विशेष अधिवेशनाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. विधानभवनाकडून विशेष अधिवेशन रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विशेष अधिवेशन होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर रात्रीच उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना भेटून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे हे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे, तशी विनंती केली आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला (BJP) तुमच्याकडे बहुमत आहे का, हे विचारेल. भाजपकडे बहुमत असेल तर ते त्याचं पत्र राज्यपालांना देतील, यानंतर राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावतील. शपथविधीमध्ये सुरूवातीला मुख्यमंत्री आणि ठराविक महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. शपथविधी झाल्यानंतर भाजपला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल. बहुमत सिद्ध झाल्यानंतर उरलेल्या मंत्रीमंडळाचा शपथविधी घेण्यात येईल. १ जुलैला शपथविधी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या