मंजुळाच्या हत्येनंतर सांडलेले रक्त आणि काठी माझ्यासमोर नष्ट केली-रमेश कदम

मंजुळाच्या हत्येनंतर सांडलेले रक्त आणि काठी माझ्यासमोर नष्ट केली-रमेश कदम

"भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्येची हत्या केल्यानंतर तिच्या बराकमधील सांडलेले रक्त आणि तिच्यावर अत्याचार करण्याकरता वापरण्यात आलेली काठी माझ्यासमोर इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आली"

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

14 जुलै : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्येची हत्या केल्यानंतर तिच्या बराकमधील सांडलेले रक्त आणि तिच्यावर अत्याचार करण्याकरता वापरण्यात आलेली काठी माझ्यासमोर इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आली असल्याचा खळबळजनक खुलासा अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये असलेल्या आमदार रमेश कदम यांनी केलाय.

महिला कैदी मंजुळा शेट्ये हिची हत्या केल्यानंतर संध्याकाळी ६ नंतर हत्येची शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांच्या मदतीने जेल पोलीस अरुण जाधव आणि बनसोडे यांनी आरोपी गुलाब यादव, चंद्रकांत यादव, सुभाष यादव आणि आरोपी मंडल यांच्या मदतीने स्वच्छता करुन पुरावे नष्ट केल्याचा खळबळजनक आरोप आमदार रमेश कदम यांनी केलाय. आपल्या समोर हा सर्व प्रकार घडला असून आपला मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कलम १६४ खाली जबाब नोंदवावा अशी मागणी आज आमदार रमेश कदम यांच्या वतीने त्यांचे वकील नितीन सातपुते यांनी केलाय.

तर याच प्रकरणातील सहा आरोपी जेल अधिक्षक मनीषा पोखरकर, बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांची आज मुंबई किला कोर्टाने १४ दिवसांकरता न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीये. धक्कादायक म्हणजे एरवी सरकारी वकील आरोपींच्या पोलीस कोठडी करता जोरदार युक्तीवाद करतात पण आज मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडी करता काही युक्तीवाद न करता थेट ६ ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. कारण सर्व आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी भोगलीये.

मंजुळा शेट्येची हत्या करण्याकरता वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर महत्वाचे पुरावे मिळाले नाहीत असं तपास अधिका-यांनी न्यायालयात सांगितलं होतं. तर गेल्या सुनावणी वेळेस आणखी आरोपी निष्पन्न झालेत, आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, हत्यार शोधायचे आहे आणि आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत असा युक्तीवाद करण्यात आला होता. यापैकी एकाही मुद्द्यांवर यावेळी युक्तीवाद देखील करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 09:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading