राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानांची केली तोडफोड

राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानांची केली तोडफोड

काल गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये अंगार चेतवल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या वसईत लावण्यात आलेल्या गुजराती पाट्यांची तोडफोड केली आहे.

  • Share this:

19 मार्च : काल गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये अंगार चेतवल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या वसईत लावण्यात आलेल्या गुजराती पाट्यांची तोडफोड केली आहे. या संदर्भाचत त्या परिसरातल्या हॉटेल चालकांना, पोलीस प्रशासनाला आणि पालिकेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा पत्रं दिली होती. मात्र या पत्रांना संबंधित यंत्रणांनी दाद न दिल्यानं काल रात्री राज ठाकरे यांच्या सभेहून घरी परतणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या पाट्यांची तोडफोड केली.

वसई तालुक्याला महाराष्ट्रातून हद्दपार करून त्याचा गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रताप काही व्यावसायिकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उजेडात आला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, राज ठाकरेंच्या शिवतिर्थावरील सभेनंतर रात्री उशीरा वसईतील पाच ते सहा दुकानांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

दुकानांच्या पाट्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काट्यांनी आणि लोखंडी रॉडने तोडून काढली. ही दुकाने गुजराती लोकांची होती असे वृत्त आहे. दुकानासोबतच गुजराती गाड्यांचीही तोडफोड केली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल करत गुजराती पाट्यांची तोडफोड केली आणि महाराष्ट्रात मराठी पाट्या लावल्या पाहिजे ही आता सुरवात असल्याचे संखे यांनी ठासून सांगितलं आहे.

First published: March 19, 2018, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading